मुंबई, 29 सप्टेंबर: प्रतिनिधी-ज़ैन सय्यद, गेल्या काही दिवसात मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणत मुलांच्या अपहरणाचे फेक मॅसेज समाज माध्यमातून व्हायरल होत आहेत. याचा वाईट परिणाम आता लहान मुलांवर देखील होताना दिसत आहे. घाटकोपरमध्ये एका 11 वर्षाच्या विध्यार्थ्यांने शाळेत जायचे नाही म्हणून स्वतःचेच किडनॅपिंग झाल्याचा बनाव रचला. यामुळे घाटकोपर पोलोसांची काही तास पळता भुई थोडी झाली. परंतु नंतर हा त्या मुलानेच बनाव केला असल्याचे कबूल केले.
घाटकोपरच्या अशोक नगर विभागात राहणाऱ्या या 11 वर्षीय मुलाला कमी मार्क्स पडले होते. त्यामुळे शाळेत पडणारा ओरडा नको होता. अशातच मोठ्या भावाच्या मोबाईलवर अपहरणाचे फेक मॅसेज त्याने पाहिले होते. मग आपल्याला ही असे किडनॅपिंग झाल्याचे घरच्यांना सांगितले. घरच्यांनी मुलाला सोबत घेऊन घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. मुलाने आपल्याला शाळेत जात असताना दोन जणांनी चालू रिक्षात ओढून अपहरण करण्याचा प्रयत्न केला, माझे तोंड दाबले पण मी उडी मारली आणि पळून आलो असे त्याने पोलीस अधिकाऱ्यांना ही सांगितले.
हे ही वाचा : दांडिया खेळू न दिल्याने रागात तिघांवर हातोड्याने वार; नवी मुंबईतील खुनी थरार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांनी तात्काळ पथके तयार करून या रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले. मात्र सीसीटीव्ही आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून अशी घटना घडलीच नसल्याचे समोर आले. या नंतर पोलिसांनी या मुलालाच विश्वासात घेऊन विचारले असता त्याने हा बनाव रचल्याचे संगीतले.
आपल्याला शाळेत कमी मार्क पडले आहेत. मला शाळेत जायचे नव्हते आणि फेक मेसेजप्रमाणे आपण ही आपले अपहरण झाले सांगितले. तर शाळेत जाऊ देणार नाही म्हणून हे केल्याचे त्या मुलाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी देखील एवढ्या मुलाने रचलेल्या या बनावामुळे डोक्याला हात लावून घेतला. मात्र त्या नंतर या मुलाला पुन्हा असे करू नये असे समजावून त्याला पालकांच्या हवाली केले.
हे ही वाचा : पुणे : शाळेच्या आवारातच थरारक घटना; दहावीतील मुलाचा विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला
असा केला बणाव…
या मुलाने प्लॅन केला. त्याने स्वतःकडील दप्तर एका शेजाऱ्याच्या घरी ठेवले आणि त्यांना आपले आईवडील घरी नाहीत हे दप्तर इथेच ठेवा असे सांगितले. नंतर कपडे आणि केस विस्कटून घरी गेला. घरी जाऊन आपले दोन जणांनी शाळेत जात असताना अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्याच्या आईवडिलांनी मुलाला सोबत घेऊन घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. मुलाने आपल्याला शाळेत जात असताना दोन जणांनी चालू रिक्षात ओढून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. माझे तोंड दाबले पण मी उडी मारली आणि पळून आलो परंतु माझे दप्तर ते घेऊन गेले अशी माहिती त्याने पोलीस अधिकाऱ्यांना ही सांगितले.