प्रमोद पाटील, नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर संकुलातील मधल्या रस्त्यावर किन्नरांनी चांगलाच धिंगाणा घातला आहे. दुर्गापूजा विसर्जना वेळी किरकोळ वादाच्या कारणावरून महिला आणि किन्नरांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सीबीडी बेलापूरच्या टाटा नगर झोपडपट्टी येथे ही घटना घडली. दरम्यान या घटनेने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. महिला आणि किन्नर यांच्यातील वाद इतका वाढला की किन्नर रस्त्याच्या मधोमध येऊन कपडे काढून धिगाणा करत होते. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
याप्रकरणी नवी मुंबईतील बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विसर्जनासाठी बेलापूरच्या तलावात दुर्गा मूर्तीचे विसर्जन करून जात असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी तीन महिला आणि एका मुलावर एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : रेल्वे चुकून दुसऱ्या ट्रॅकवर लागल्याने प्रवाशांनी जीव धोक्यात घालून केला पराक्रम LIVE VIDEO
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, बेलापुरातील काही मंडळी दुर्गामाता विसर्जन करण्यासाठी गेले होते. विसर्जन करून येताना महिला आणि किन्नर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला यामध्ये काही किन्नरांनी आपल्या अंगावरील कपडे काढत धिंगाणा करण्यास सुरू केले. यावरून काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
याप्रकरणी नवी मुंबईतील बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विसर्जनासाठी बेलापूरच्या तलावात दुर्गा मूर्तीचे विसर्जन करून जात असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी तीन महिला आणि एका मुलावर एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : रिलेशनशीपमध्ये धोका, धार्मिक भावना दुखावणे, नो पार्कींगमध्ये गाडी, Reelsने निलंबन, काय सांगतो कायदा?
पुरोगामी कोल्हापुरातही असाच प्रकार
पुरोगामी कोल्हापुरात लाजिरवाणी घटना समोर आली आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली तृतीयपंथींचा सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना काल, सोमवारी देवीचे जग आणण्याच्या मिरवणुकीत तृतीयपंथीनी हे अत्यंत लाजीरवाणे कृत्य केले. हातात सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर हा धिंगाणा सुरु होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरीकांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. त्याबाबत आज, मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात कायद्याचा भंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.