JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईतील व्यावसायिकानं केदारनाथधामला दान केलं 230 किलो सोनं, मंदिराच्या भिंती सोन्याने मढवल्या

मुंबईतील व्यावसायिकानं केदारनाथधामला दान केलं 230 किलो सोनं, मंदिराच्या भिंती सोन्याने मढवल्या

मुंबईतील एका व्यापाऱ्याने केदारनाथ मंदिरासाठी 230 किलो सोनं दान केलं आहे. या सोन्यानं श्री केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती मढवण्यात आल्यात.

जाहिरात

फाईल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 ऑक्टोबर : भारतामध्ये धार्मिक स्थळी, एखाद्या मंदिरात दानधर्म करणाऱ्या भाविकांची कमी नाही. सोनं, चांदीच्या दागिन्यांसह कोट्यावधी रुपयांचं दान करणारे देणगीदार भारतात आहेत. आता मुंबईतील एका व्यापाऱ्यानं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर उत्तराखंडमधल्या जगप्रसिद्ध श्री केदारनाथ मंदिराच्या भिंतींना पत्रा लावण्यासाठी तब्बल 230 किलो सोनं दान केलं आहे. या दानशूर व्यापाऱ्याचे उत्तराखंड सरकार आणि मंदिर समितीनं आभार मानलेत. ‘एशियानेट न्यूज’ने याबाबत वृत्त दिलंय. भारतात धार्मिक स्थळांना देणगी देणाऱ्यांची कमतरता नाही. त्यांची श्रद्धा मंदिरातील देवासोबत इतकी जोडलेली असते, की ते त्यांच्या श्रद्धेपोटी लाखो रुपये, सोनं-चांदी इत्यादी दान करतात. आता मुंबईतील एका व्यापाऱ्याने केदारनाथ मंदिरासाठी 230 किलो सोनं दान केलं आहे. या सोन्यानं श्री केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती मढवण्यात आल्यात. या भिंतींना सोन्याचा पत्रा लावला असून, त्यावर भगवान शंकराचं प्रतीक असलेले शंख, त्रिशूळ, डमरू अशी चिन्हंही कोरण्यात आली आहेत. यासोबतच ‘जय केदारनाथ धाम’ आणि ‘हर हर महादेव’ असे मंत्र देखील लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या या भिंती आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. दरम्यान, या पूर्वी केदारनाथधामच्या गर्भगृहाच्या भिंती चांदीच्या होत्या. सामर्थ्याविना शांती असंभव, कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींची डरकाळी, जवानांना दिला दिवाळी संदेश पुजाऱ्यांनी दिला होता उपोषणाचा इशारा मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींना सोन्यानं मढवण्यास मंदिरातील स्थानिक पुजारी विरोध करत होते. मंदिराच्या चार भिंतींवर सोन्याचा पत्रा लावल्यामुळे गर्भगृहाच्या पौराणिक परंपरेला तडा जात असल्याचं त्यांचं मत होतं. तसंच यासाठी उपोषण करण्याचा इशाराही पुजाऱ्यांनी दिला होता. पण मंदिर समिती आणि उत्तराखंड सरकारनं या भिंती सोन्यानं मढवण्यास परवानगी दिली. दिवाळीनिमित्त विक्रमी 17 लाख दिव्यांनी उजळली अयोध्या; डोळ्यांची पारणे फेडणारे फोटो पाहा सोनं दान करण्याचा निर्णय घेतला, कारण… मंदिरासाठी 230 किलो सोनं दान करणाऱ्या मुंबईतील व्यावसायिकानं सांगितलं की, ‘जेव्हा मी भगवान केदारनाथाच्या दर्शनासाठी जायचो, तेव्हा मला असं वाटायचं की गर्भगृहाच्या चांदीच्या भिंती सोन्याच्या असाव्यात. यासाठी मी हे सोनं दान करण्याचा निर्णय घेतला.’ त्यानंतर करोडो रुपये खर्च करून 230 किलो सोनं या व्यावसायिकांनं मंदिरासाठी दान केलं. याच सोन्यानं मंदिर समितीनं दिवाळीच्या मुहूर्तावर गर्भगृहाच्या भिंती मढवल्या. दरम्यान, केदारनाथ मंदिराला मोठे धार्मिक महत्त्व असून येथे दर्शनासाठी केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून भाविक येतात. भाविकांचं हे मोठं श्रद्धास्थान असून हा परिसर पर्यटकांसाठी देखील नेहमीच आकर्षणाचा केंद्र राहिलाय. आता या मंदिराच्या भिंती सोन्यानं मढविण्यात आल्यानं भाविकांसाठी हे आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या