भोंग्यावर राज ठाकरेंची आक्रमक भूमिका
मुंबई, 27 नोव्हेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवर वाजणाऱ्या भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अजूनही काही जणांना चरबी आहे. काही ठिकाणी अद्याप भोंगे उतरवले नाहीत. या विरोधात मनसैनिकांनी भूमिका घेण्याचं आवाहनही राज ठाकरे यांनी दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर पार पडली. यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनं सर्वाधिक यशस्वी झाली आहेत. मात्र, मनसेचं यश लोकांच्या विस्मरणात जाण्यासाठी काही यंत्रणा काम करत आहे. टोलमुक्त करण्यासाठी राज्यात आपण आंदोलने केली. मात्र, ज्यांनी निवडणुकांआधी महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा केली. त्यांना कोणीच प्रश्न विचारत नाही. मनसेच्या आंदोलनावर एक पुस्तिका काढणार आहे. राज्यात होणाऱ्या नोकऱ्यांची जाहिरात राज्यातील वृत्तपत्रात दिली जात नव्हती. ज्यावेळी परप्रांतीय विद्यार्थी महाराष्ट्रात परीक्षा द्यायला आले. त्यावेळी हे प्रकरण मनसेने उचलून धरलं. रेल्वे भरतीसाठी युपीपेक्षा बिहारचे लोक जास्त आले होते. हिंदी चॅनेल्सवाल्यांनी मनसेविरोधात रान उठवलं होतं. असं असतानाही भाजपने उत्तरभारतीयांना तिकीटं दिली. मनसेची आंदोलनं बदनाम केली जात आहे. वाचा - आपलं वय काय, बोलताय काय? पदाचा मान राखतोय, अन्यथा शिव्या खूप आहेत; राज ठाकरेंचा कोश्यारींवर निशाणा मुख्यमंत्री पदावर असताना तब्बेतीचं कारण सांगून, असं सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिंदे यांनी रात्रीत कांडी फिरवली आणि घराबाहेर काढलं. उद्धव ठाकरे यांनी कधीच भूमिका घेतली नाही. पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेनेच भूमिका घेतली.
महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होते. आज दोन प्रकल्प जातात याचे वाईट एका गोष्टीचे वाटतं. कुठल्याही राज्यात प्रोजेक्ट केले त्याचं वाईट नाही वाटतं. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. नरेंद्र मोदी तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. ही आपली धारणा होती, आहे आणि राहील.