मुंबई, 31 ऑगस्ट : मुंबई ( mumbai ) मधील जीटीबी नगरमधील पंजाबी कॉलनीत कधीही पडू शकतील अश्या 25 जीर्ण इमारतीमध्ये 100 पेक्षा अधिक कुटुंबे स्वतःचा जीव धोक्यात घालून वास्तव्य करत आहेत. या इमारती बीएमसीनं ( bmc ) जीर्ण झाल्याची घोषणा केलीली असून रिकाम्या करण्याचे आदेश दिलेले आहेत. पण पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेले रहिवासी अजूनही तिथेच राहत आहेत. लाखात असणारे डिपोजिट आणि हजारात असणारे घरभाडे परवडत नसल्याने जीव धोक्यात घालून रहिवासी या इमारतीमध्ये राहत आहेत. ज्यावेळी भारत पाकिस्तानचे 1947 च्या काळात विभाजन झाले त्याकाळी अनेक कुटुंबे पाकिस्तानमधील मुंबईत आली. त्या काळी तत्कालिन सरकारने मिठागरांमधील काही भुखंडावर 25 इमारती बांधल्या. मात्र, काही काळानंतर इमारती जीर्ण झाल्या. कोणत्याही प्रकारचं पुनर्विकासाचं काम ठोस धोरण नसल्याने केले गेले नाही. कायदेशीर आणि काही अटीमुळे इमारतीचा पुनर्विकास होऊ शकला नाही. या इमारती धोकादायक असल्याने बीएमसीनं रिकाम्या करण्यास सांगीतले आहे. माञ, येथे राहणाऱ्या लोकांना कुठे निवारा ऊपलब्ध करून द्यायचा हा महत्वाचा प्रश्न आहे. हेही वाचा : Ganesh Chaturthi 2022: पुणेकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी ‘ही’ बातमी वाचा, वाहतुकीमध्ये आहेत मोठे बदल इमारत क्रमांक 5 मध्ये राहणाऱ्या रहिवासी सुमन कोचाड म्हणल्या की, गेले अनेक वर्षे येथे राहत आहोत. काही काळासाठी मी माझ्या नातेवाईकाकडे गेले मात्र नातेवाईकाकडे अनेक काळ राहणे ठीक नसल्याने मी परत एकदा या धोकादायक इमारती मध्ये राहायला परतले आहे. माझ्या पतीला अर्धांगवायू आहे. आता या धोकादायक इमारती मध्ये मी राहते. पैसेच नाहीत तर काय करणार आणि कुठे जाणार? बाहेर इतकं डिपोजिट आहे भाडे आहे ते तर परवडत नाही. अर्धांगवायू असलेल्या पतीसोबत मी जाणार तरी कुठे? कधीही जीव घेईल अशा इमारतीमध्ये आम्ही राहत आहोत. काही वर्षांपूर्वी रहिवासी संगीता थापर यांचे पती कॅन्सरने वारले. संगीत थापर गेले अनेक वर्षे या धोकादायक आणि जीर्ण इमारतीत राहतात. कधीही पडू शकतील अशा आणि आतमध्ये गेल की अंगावर काटा येत असलेल्या इमारतीत थापर राहतात. संगीता म्हणाल्या की, काय करनार अणि कुठे जाणार बाहेर 20 हजार ते 25 हजार भाडे आहे. परवडत नाही भाडे देणं. बीएमसी खाली करण्याचे नोटीस पाठवले आहे. तीन महिना अगोदर नोटीस मिळालं दोन महिने उलटून गेले. एक महिना राहिला आहे. खिशात एक रूपया नाही कुठे जाणार आण काय करणार? सरकारने आम्हाला मदत करायला हवी. हेही वाचा : गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीनं अगदी झटपट बनवा उकडीचे मोदक, पाहा VIDEO सिमरन सिंह गेले अनेक वर्षे या भागात राहतात. सिमरन सिंह म्हणाले की, पंजाबी कॉलनी पुनर्विकासाचा मुद्दा अजून प्रलंबित आहे. इमारतीचा भाग जीर्ण झाला असून कधीही या इमारती पडू शकतात. जीव संकटात घालून आम्ही या इमारतीमध्ये राहत आहोत. आमच्या पूर्वजांनी 60 लाखात घर घेतले होते मात्र आता याची किंमत 30 लाख इतकी देखिल नाही. करणार काय इतकी परिस्थीती वाईट आहे. आता पैसे देऊन आम्ही दुसर घर देखिल घेऊ शकत नाही. इतकी परिस्थीती वाईट आहे. म्हाडा बरोबर आमचं बोलण सुरू आहे. बीडीडी चाळींच्या धर्तीवर पंजाबी कॉलनीचा देखील विकास होणे आवश्यक आहे. दरम्यान, या संदर्भात म्हाडाच्या पॅनेलवर असणारे वास्तुविशारद पुरुषोत्तम रेडेकर म्हणाले की, पंजाबी कॉलनीची अवस्था खुप वाइट आहे. मदत व पुनर्वसन खाते व म्हाडाच्या वतीने संयुक्त पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. बीएमसीनं इमारती पाडण्याचं ठरवलं आहे. C1 कॅटेगरी मध्ये ह्या इमारती मोडत आहेत. म्हणून आम्ही म्हाडाच्या वतीने पुनर्विकासाचा प्लॅन बनविला असून अड्वान्स स्टेज वर हा प्लॅन आहे.