JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / '...तर त्यांची अवस्था आज फार वाईट करून सोडली असती', राऊतांचा शिंदेंवर घणाघात

'...तर त्यांची अवस्था आज फार वाईट करून सोडली असती', राऊतांचा शिंदेंवर घणाघात

‘बाळासाहेबांचा पक्ष तोडण्याचं काम झालं. पुन्हा ज्या पद्धतीने बाळासाहेब आमचे असं सांगितलं जात आहे, हे ढोंग आहे. बाळासाहेबांनी अशा ढोंगाचा तिरस्कार केला.

जाहिरात

'बाळासाहेबांचा पक्ष तोडण्याचं काम झालं. पुन्हा ज्या पद्धतीने बाळासाहेब आमचे असं सांगितलं जात आहे, हे ढोंग आहे. बाळासाहेबांनी अशा ढोंगाचा तिरस्कार केला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 नोव्हेंबर : ‘बाळासाहेब आज जर असते आणि ज्यांनी कमरेखाली घाव घातले असते, त्यांची अवस्था आज फार वाईट करून सोडली असती. त्यांच्याकडे फटकारे होते, ज्या भूमिका आणि विचार होते, त्यामुळे महाराष्ट्र भक्कम झाला. ते हिमालयापेक्षा मोठे होते. आज त्या तोडीचे नेतृत्व राज्यात नाही. आजही बाळासाहेबांच्या नावाने जे तोतये निर्माण झाले आहे, ते फार काळ टिकणार नाही’, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. वीर सावरकर यांच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीवर टीका केली होती. त्या टीकेला आज संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

‘बाळासाहेबांचा पक्ष तोडण्याचं काम झालं. पुन्हा ज्या पद्धतीने बाळासाहेब आमचे असं सांगितलं जात आहे, हे ढोंग आहे. बाळासाहेबांनी अशा ढोंगाचा तिरस्कार केला. त्यांनी सतत सांगितलं, महाराष्ट्रात ढोंग चालणार नाही, अशा ढोंग करणाऱ्यांना लाथ मारली पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी कधीच ढोंगाचा विचार केला नाही. महाराष्ट्रात काही ढोंगी लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारचे आहोत असं सांगत आहे, ते ढोंगी आहे, हे महाराष्ट्राची जनता ओळखून आहे, असा टोलाही राऊत यांनी शिंदेंना लगावला. बाळासाहेब आज जर असते आणि ज्यांनी कमरेखाली घाव घातले असते , त्यांची अवस्था आज फार वाईट करून सोडली असती. त्यांच्या फटकारे होते, ज्या भूमिका आणि विचार होते, त्यामुळे महाराष्ट्र भक्कम झाला. ते हिमालयापेक्षा मोठे होते. आज त्या तोडीचे नेतृत्व राज्यात नाही. आजही बाळासाहेबांच्या नावाने जे तोतये निर्माण झाले आहे, ते फार काळ टिकणार नाही, अशी टीका राऊत यांनी शिंदेंवर केली. ‘बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार आमच्या मनगटात भिणवला. ज्यांचं हिंदुत्व खोटं आहे, अशा भंपक लोकांना या उपाध्या लावायच्या असत्या जे भंपक आहे. त्यांचं हिदुत्व खोटं आहे. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे आपोआप हे उपाध्या लागलेल्या असतात. ते वारंवार सांगण्याची गरज नाही. कुणाला वाटत असेल तर सावरकर यांना भारतरत्न द्यावा, आमची तशी मागणीच आहे. सावरकर यांना भारतरत्न तर दिला पाहिजे. तो का दिला जात नाही? हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा सावरकर यांच्यासोबत भारतरत्न दिला पाहिजे. सावरकर यांना भारतरत्न देऊन सन्मान का केला नाही, असा सवाल करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना जशास तसे उत्तर दिले. (नारायण राणे नरमले, BMC चा जेसीबी येण्याआधीच बंगल्यावर स्वत: चालवला हातोडा!) वीर सावरकर यांना भारतरत्न द्या, ढोंगी प्रेम दाखवू नका. आमची आधीपासून ही मागणी आहे. आताही तिच मागणी आहे, असंही राऊत म्हणाले. (‘जशी प्रेयसीची आठवण, तशी 40 खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची’ खडसेंनी कवितेतून शिंदेंना लगावला टोला, VIDEO) ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. अनेक घाव झेलून उभी आहे. बाळासाहेब असताना सुद्धा पाठीत खंजीर खुपसले गेले. पण सगळे वार सहन करून शिवसेना उभी आहे. त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले. महाराष्ट्राची नाडी ओळखणारे ते नेते होते. आजही त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेबांच्या विचारांची मशाल ही निष्ठावंत शिवसैनिकांच्या हाती आहे. महाराष्ट्राला सध्या महत्त्व प्राप्त करून दिले, त्याचं तेज कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या