अमित राय, मुंबई 26 सप्टेंबर : अंधेरी स्टेशनवरुन एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे.ज्यात एक महिला ट्रेनमधून कोसळली आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकली. यानंतर ही महिला ट्रेनखाली जाऊ लागली. मात्र, हेड कॉन्स्टेबल मुनिशंकर मिश्रा यांनी ही बाब लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली आणि महिलेचा जीव वाचवला. भरधाव डंपरची 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक; वाशी टोलनाक्यावर विचित्र अपघाताचा VIDEO ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आला असून हे दृश्य थरकाप उडवणारं आहे. ही घटना 23 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 56 मिनिटांच्या सुमारास घडली. मुनिशंकर मिश्रा हे प्लॅटफॉर्मच्या राऊंडवर असताना त्यांना चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनमधून एक महिला पडताना दिसली. यानंतर त्यांनी लगेचच धाव घेतली आणि तिला वाचवलं.
तोल जाऊन ही महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधील जागेत कोसळली होती, ती ट्रेनखाली जात होती. हे पाहताच महिला प्रवाशाला त्यांनी त्याच धावत्या ट्रेनखाली जाण्यापासून वाचवलं आणि यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने तिला स्टेशन मास्तरच्या कार्यालयात आणलं. इथे महिलेनं आपलं नाव जोश्ना भरणे असं सांगितलं आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला. यासोबतच आरपीएफ अंधेरीच्या कर्मचाऱ्यांचे तिचा जीव वाचवल्याबद्दल आभारही मानले. 2 दुचाकींना चिरडत घरात घुसला भरधाव ट्रक; 20 वर्षीय तरुणीचा भयंकर शेवट, नांदेडमधील घटना अनेकदा लोक ट्रेनच्या दरवाजामध्ये उभा राहाण्याचा किंवा धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही चूक जीवावरही बेतू शकते. याचाच प्रत्यय देणारी ही घटना समोर आली आहे. काही वेळाचा विलंब झाला असता तरी या घटनेत महिलेचा जीव जाण्याची शक्यता होती.