JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दुर्मिळ पुस्तकांचा खजिना असलेलं ठिकाण, मुंबईकरांचा शोध इथं संपतो! पाहा Video

दुर्मिळ पुस्तकांचा खजिना असलेलं ठिकाण, मुंबईकरांचा शोध इथं संपतो! पाहा Video

मुंबईतील पुस्तक प्रेमींसाठी एक खास जागा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही एखाद्या दुर्मिळ पुस्तकाच्या शोधात आहात? तर तुमचा शोध इथं हमखास संपेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 नोव्हेंबर : ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण अनेकांना माहिती असेल. पुस्तकं ही आपल्याला शहाणी करतात. त्यामुळे नवे विषय माहिती होतात. आपण शहाणे होतो. सोशल मीडियाच्या या युगात 24 तास गॅझेट्सच्या प्रेमात बुडालेल्या तरूणांची संख्या वाढत असली तरी पुस्तकांचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही एखाद्या विषयातील अंतिम सत्य, पुरावा शोधण्यासाठी पुस्तकांचाच आधार घेतला जातो. मुंबई तील पुस्तक प्रेमींसाठी एक खास जागा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही एखाद्या दुर्मिळ पुस्तकाच्या शोधात आहात? एखादे पुस्तक कमी किंमतीमध्ये हवं आहे? तर तुमचा शोध हमखास इथं संपतो. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागातील पुस्तकप्रेमी इथं हमखास भेट देतात. मुंबईतलं पुस्तकांचं मार्केट मुंबईतलं हुतात्मा चौकात असलेल हे पुस्तकांचं मार्केट म्हणजे वाचनवेड्यांचं आवडत ठिकाण आहे. अनेक वर्षांपासून जुनी पुस्तकं इथं सहज मिळतात. येथील विक्रेत्यांना एखाद्या जुन्या पुस्तकाचे नाव सांगितल्यास ते मिळवूनही देतात. मेडिकल, इंजिनिअरिंगच्या अभ्यासाची पुस्तकं सुद्धा येथे कमी किमतीत मिळतात. कोणत्या प्रकारची पुस्तकं मिळतात?  वैज्ञानिक, तंत्रज्ञान, नावाजलेले लेखकांची पुस्तकं, कादंबऱ्या, महापुरुषांची चरित्र, तसंच विदेशी पुस्तकं, इंग्रजी भाषेतल्या नावाजलेल्या कादंबऱ्या या मार्केटमध्ये मिळतात. ज्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह आहे त्या व्यक्ती येथे येऊन वाचलेली पुस्तकं विकतात त्यामुळे अनेक दुर्मिळ पुस्तकंही इथं नेहमी उपलब्ध असतात. Video : भंगारपासून नवं विश्व बनवणारा अफलातून मुंबईकर कमी किंमतीमुळे लोकप्रिय हुतात्मा चौकातील या पुस्तकांच्या दुकानात अगदी कमी किमतीत पुस्तकं मिळतात. निम्म्या किंवा निम्म्यापेक्षा कमी भावात सुद्धा इथं पुस्तक मिळतं. अभ्यासक्रमातील महागडी पुस्तकंही कमी दरात मिळत असल्यानं अनेक विद्यार्थ्यांसाठी ही हक्काची जागा आहे.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

पुस्तकं वाचा आणि विका! अनेकांच्या घरात एकदा पुस्तकं वाचली की ती रॅकमध्ये तशीच ठेवली जातात. त्याला धूळ, जाळी लागते. त्यामुळे या पुस्तकांची स्थिती पाहून ती खरेदी केली जातात, असं येथील पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. काही विक्रेते पुस्तक वाचून झाल्यावर त्या पुस्तकाची स्थिती पाहून ती पुन्हा खरेदी करतात. त्याची रक्कम ग्राहकांना परत केली जाते. विशेषत: शनिवार-रविवार इथं तरुणाईची मोठी गर्दी असते. कागदी लगद्यातून क्रांती करणारा कलाकार, Video पाहून बसणार नाही डोळ्यांना विश्वास! ‘माझी मुलगी यावर्षी 10वी पास झाली आहे. आम्ही सहकुटुंब शनिवारी किंवा रविवारी या ठिकाणी भेट देतो. आम्हाला वाचनाची आवड असल्याने आम्ही अनेक पुस्तकं वाचली आहेत. पुस्तकं वाचून झाल्यावर परत देताना योग्य रक्कम सुद्धा येथील दुकानदार देतात असं ग्राहक चेतन बदीयानी यांनी सांगितलं. या भागात अनेक पायरेटेड पुस्तकांची विक्री होते, असा आरोप केला जातो. येथील विक्रेत्यांनी मात्र तो आरोप फेटाळला आहे. ‘आम्ही कॉपीराईट फ्री असलेली पुस्तकं सुद्धा विकतो. ज्यांच्याकडे चांगल्या पुस्तकांचं कलेक्शन आहे ती मंडळी इथं पुस्तकं विकतात, आम्ही पायरसी असलेले पुस्तकं विकत नाही, असा दावा येथील विक्रेते राजेंद्र यांनी केला.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या