JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai Police Fake Call : मुंबईत बॉम्ब स्फोट घडवून आणणार असल्याच्या फोनने खळबळ, पुण्यातून समोर आलं सत्य

Mumbai Police Fake Call : मुंबईत बॉम्ब स्फोट घडवून आणणार असल्याच्या फोनने खळबळ, पुण्यातून समोर आलं सत्य

मुंबई पोलिसांना निनावी फोन आला रेल्वे स्थानकावर बॉम्ब स्फोट घडवू आणला जाणार असल्याचा तो फोन होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट असल्याचेही सांगण्यात आले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोंबर : मुंबई पोलिसांना निनावी फोन आला रेल्वे स्थानकावर बॉम्ब स्फोट घडवू आणला जाणार असल्याचा तो फोन होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट असल्याचेही सांगण्यात आले. तसेच मुंबईतील काही भागासह रेल्वे स्थानकावर बॉम्ब स्फोट घडवून आणला जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान ही माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमधील एका संगणक अभियंत्याला पोलिसांनी अटक केलं आहे.

मनोज अशोक हंसे असं अटक केलेल्या अभियंत्याच नावं असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हंसे यांने माझ्या घराच्यावरील फ्लॅट मध्ये बॉम्ब बनविण्याचे काम सुरू आहे. असा एक फोन पोलीस नियंत्रण कक्षाला केला होता. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले मात्र तिथं तसं काही आढळलं नाही.

हे ही वाचा :  कंपनीच्या ऑफिसमध्ये सुरू होतं हायप्रोफाईल सेक्स रॅकेट; असा झाला भांडाफोड, जळगावात खळबळ

संबंधित बातम्या

त्याबाबत पोलिसांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने पोलिसांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून संबधित आरोपी वैफल्यग्रस्त असल्याने त्याने असं कृत्य केलं असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोटी सापडल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ही घटना ताजी असताना आता मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला (Lalit Hotel in Mumbai ) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी अज्ञाताने दिली होती. धक्कादायक म्हणजे, मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेलाच याबद्दल धमकीचे मेसेज पाठवण्यात आला होता. यामुळे खळबळ उडाली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  13 लोकांचा जीव घेणारा ‘राक्षस’ अखेर जाळ्यात अडकलाच, नरभक्षी सीटी 1 वाघ जेरबंद

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरू आहे. आता मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक धमकीचा मेसेज मिळाला आहे. यामध्ये मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे फोन करून सांगितले, त्यामुळे एकच खळबळ उडाली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या