मुंबई, 21 ऑक्टोबर : दिवाळीमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मुंबईकर
दिवाळी
च्या खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात विशेषत: दादरमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतो. दिवाळीच्या निमित्तानं दादरमध्ये वर्षातून एकदाच भरणारी ग्राहक पेठ हे
मुंबई
करांचे विशेष आकर्षण असते. दिवाळीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू एकाच छताखाली या ग्राहक पेठेत मिळतात. ग्राहक पेठेत कोणत्या वस्तू मिळतील? दादरमध्ये भरणारी ग्राहक पेठ ही युनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये खादीचे कपडे, चिकनकारी कुर्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, काश्मिरी ड्रेस, निरनिराळी ज्वेलरी, भांडी, स्नॅक्स, लोणचे, मुखवास, आकाशकंदील, लाइटिंग्स, कोस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं,अशा वस्तू इथं एकाच ठिकाणी खरेदी करता येतात. ग्राहक पेठेतील वस्तूंच्या किमती काय आहेत? निरनिराळ्या वस्तू इथं खरेदी करता येत असल्यानं निखळ खरेदीचा आनंद घेण्यासाठी इथं मुंबईकर गर्दी करतात. ग्राहक पेठेत 200 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत कपडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या लाकडी वस्तू इथं 1000 रुपयांच्या आत मिळतात. तर इतर वस्तूंच्या किंमतीही 800 पेक्षा कमी आहेत.
मुंबईच्या ‘या’ मार्केटमध्ये अर्ध्या किंमतीमध्ये मिळतात महिलांचे ड्रेस, Video
काश्मिरी कुर्तीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स इथं उपलब्ध आहेत. तसेच लाकडी भांडी, खेळणी, किचेन्स, ज्वेलरीचे बाजारात सहसा न मिळणारे प्रकार ग्राहक पेठेत मिळतात. त्यामुळे ते ग्राहक पेठेचं मुख्य आकर्षण आहे. मुंबईकर ग्राहकपेठेची आतुरतेनं वाट पाहतात. मराठी माणसांच्या व्यवसायासाठी एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध आहे. त्यामुळे मराठी ग्राहक आणि मराठी व्यापारी यांना ही एक संधी आहे, असं मत येथील विक्रेत्यांनी व्यक्त केले.
गुगल मॅपवरून साभार
ग्राहक पेठ कुठे आणि किती कालावधीसाठी आहे? दादर पश्चिमेला स्टेशनपासून दोन मिनिटाच्या अंतरावर ग्राहक पेठेचे प्रदर्शन आहे. मुंबईकरांना 27 ऑक्टोबरपर्यंत इथं खरेदी करण्याची संधी आहे.