JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फुलांचा दरवळ गायब! दादरच्या फूल बाजारात कारवाई, आता फक्त याच वेळेत करता येणार खरेदी

फुलांचा दरवळ गायब! दादरच्या फूल बाजारात कारवाई, आता फक्त याच वेळेत करता येणार खरेदी

कोणताही सण आला की फुले खरेदी करण्यासाठी मुंबईकर दादरच्या मार्केटमध्ये मोठी गर्दी करतात. मात्र, आता या फुलबाजाराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 ऑक्टोबर : कोणताही सण आला की फुले खरेदी करण्यासाठी मुंबईकर दादरच्या मार्केटमध्ये मोठी गर्दी करतात. मात्र, आता या फुलबाजाराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता याठिकाणी रात्री 12 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंतच फूल बाजार भरणार आहे. याबाबत जी नॉर्थचे वरिष्ठ इन्स्पेक्टर राजन कांबळे यांनी माहिती दिली आहे. सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ राजन कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दादर फूल बाजारात एकही फुलवाला नाही. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पहाटेपासूनच कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे सकाळी सहा वाजेपासूनच ही कारवाई सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या

दादर रेल्वे परिसर स्वच्छ राहण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता फुलवाल्यांना रात्री 12 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंतच फूल बाजार भरवता येणार आहे. दिवाळीनंतरही सोन्याचे दर चढेच राहणार? काय सांगतोय बाजाराचा मूड फूल खरेदीसाठी या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. विशेषतः सणासुदीच्या काळात फुलांची खरेदी करण्यासाठी याठिकाणी भरपूर लोक येतात. यामुळे कचरा, अस्वच्छता यांचं प्रमाण वाढलं आहे. अशातच रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या