JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी : 'ती' ऑडिओ क्लिप भोवली; संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

मोठी बातमी : 'ती' ऑडिओ क्लिप भोवली; संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्याविरोधात आयपीसी 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जुलै : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज वाकोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी गेले होते. त्यानंतर आज संध्याकाळी उशिरा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्यातच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्पिल व्हायरल होतेय. या ऑडिओक्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. या ऑडिओक्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. या मागणीसाठीच त्यांनी आज वाकोला पोलीस ठाण्यात जावून आपली भूमिका मांडली. त्यानुसार संजय राऊत यांच्याविरोधात आयपीसी 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या