JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Yashwant Jadhav Income Tax Raid: महापौर किशोरी पेडणेकर यशवंत जाधव यांच्या घराच्या परिसरात, शिवसैनिकांना शांतता राखण्याचं आवाहन

Yashwant Jadhav Income Tax Raid: महापौर किशोरी पेडणेकर यशवंत जाधव यांच्या घराच्या परिसरात, शिवसैनिकांना शांतता राखण्याचं आवाहन

BMC Mayor Kishori Pednekar: शिवसेनेचे नेते आणि मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्सने धाड टाकली आहे. इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर महापौर किशोरी पेडणेकर या यशवंत जाधव राहत असलेल्या परिसरात पोहोचल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी : मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Shiv Sena Leader Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने धाड (Income Tax Raid) टाकली आहे. आयकर विभागाच्या धाडीमुळे एकच खळबळ उडाली आहे. यशवंत जाधव यांच्या घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्याचं वृत्त मिळातच महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) या घटनास्थळावर पोहोचल्या आहेत. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, हे सर्व सुडबुद्धीने केलं जात आहे. करु दे… जे सत्य आहे ते लोकांच्या समोर येईल. तपास यंत्रणेला त्रास द्यायचं नसतं त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करु नये. त्यांच काम त्यांना करु दे. मुंबई पोलिसांनाही त्रास देऊ नये. त्यामुळे शिवसैनिकांनी शांत रहावे आणि तपास यंत्रणेला काम करु द्या, हेच सांगण्यासाठी मी इथे आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट यशवंत जाधव यांच्या निवास्थानाखाली येऊन संतप्त शिवसैनिकांना शांत केलं तसेच कोणत्याही तपास यंत्रणांच्या चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. भाजपने सूडाचं राजकारण केलं तरी आम्ही घाबरणार नाही असं किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलंय. वाचा :  “BMC निवडणुका आल्याने आता मनपाच्या शिपयांवरदेखील छापा टाकू शकतात” - संजय राऊत किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, तपास यंत्रणेला, मुंबई पोलिसांना डिस्टर्ब करु नये. माझे शिवसैनिक कुठलाही अनुचित प्रकार करु नये, त्यांना समजावण्यासाठी मी इथे आली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेत्यांवर कारवाई होत आहे. “बाकी सब दूध के धुले है”. आपण छगन भुजबळ यांना पहिले आहे. त्यांना त्रास भोगावा लागला. हा मनस्ताप आम्ही भोगू. भुजबळ निवडून आले मंत्री झाले. कोर्टाने क्लिनचीट दिली असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. वाचा :  “कारवाई इथेच थांबणार नाही, आणखी चौघांवर लवकरच कारवाई” - किरीट सोमय्या यशवंत जाधव यांच्यावर काय आहे आरोप? यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आहे. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख, तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झालं. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. आयकर विभाग एका हवाला एजंटचा तपास करत असताना त्याच्या मार्फत 15 कोटी रूपये काही रोख रक्कम आणि चेक स्वरूपात जाधव कुटूंबियांकडे आल्याचे दिसून आले. या उत्पन्नाची माहिती ही जाधव कुटूंबियांनी लपवली आणि त्यावर कर चुकवला नाही असा आयकर विभागाला संशय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या