JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Big News : सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात आतापर्यंतची मोठी अपडेट, 2 महिन्यांनंतर गुन्हा दाखल 

Big News : सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात आतापर्यंतची मोठी अपडेट, 2 महिन्यांनंतर गुन्हा दाखल 

हा अपघात झालेला तेव्हा सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते. तर, अनहिता पंडोले…

जाहिरात

Cyrus Mistry Accident

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 नोव्हेंबर : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा गुजरातहून मुंबईकडे येत असताना  अपघात झाला होता . या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झालेला. तर, अनहिता पंडोले आणि त्यांचे पती डेरियस पंडोले जखमी झाले होते. अपघात झाला त्यावेळी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ अनहिता पंडोले या कार चालवत होत्या. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी गाडी चालवणाऱ्या अनहिता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला कार चालक अनहिता पंडोल यांच्यावर ३०४ (अ )प्रमाने पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायरस मिस्त्रींचा अपघात रोखता आला असता? मर्सिडीजच्या तपासासाठी हॉगकाँगहून टीम ठाण्यात सीटबेल्ट लावला नसल्याने… हा अपघात झालेला तेव्हा सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते. तर, अनहिता पंडोले आणि डेरियस पंडोले पुढे बसले होते. कार अनहिता पंडोले चालवत होत्या. या अपघातामध्ये मागच्या सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, पंडोले पती-पत्नी या अपघातात जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितलं होतं, की मागे बसलेले मिस्त्री आणि जहांगीर पंडोळे या दोघांनीही सीट बेल्ट लावलेला नव्हता. यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, मर्सिडीजने मुंबईपासून 120 किमी अंतरावर असलेल्या पालघरमधील चारोटी चेकपोस्ट पार केल्यानंतर नऊ मिनिटांत 20 किमी अंतर कापलं होतं. म्हणजेच गाडीचा वेगही जास्त होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या