JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला

भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला

नालासोपारा भागात भाजपच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात, हातावर वार केल्याने त्यांना गंभीर इजा झाली.

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रतिनिधी विजय देसाई, विरार, २० ऑगस्ट : राज्यात सत्तासंघर्ष सध्या सुरू आहे. भाजप आणि शिंदे यांच्या युतीचं सरकार आलं आहे. यांचं सरकार असूनही कायदा सुव्यवस्थेचा धाक अजूनही गुन्हेगारांना बसला नाही असं चित्र असल्याची चर्चा आहे. नालासोपारा भागात भाजपच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांवर चार ते पाच अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. नालासोपारा पूर्वेचे भाजप कार्यकर्ते अरुण श्रीवास्तव यांच्या कार्यालयात घुसून त्यांना चार ते पाच अज्ञात ईसमांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी, बाळासाहेब थोरातांच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात, हातावर वार केल्याने त्यांना गंभीर इजा झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. नालासोपाऱ्यात अंमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधात अरुण श्रीवास्तव यांनी पोलीस ठाण्यात पत्र लिहिलं होतं. याच रागातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासात सांगितलं जात आहे. तुळींज पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या