मुंबई, 17 सप्टेंबर : मागच्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाने दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. मुंबईसह उपनगरात पावसाने मागच्या 24 तासांत जोरदार हजेरी लावली. (mumbai pune rain weather update) याचबरोर पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून खडकवासलासह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईसह उपनगरातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. तसेच सातारा जिल्ह्यातील कोयनेतूनही पाण्याच विसर्ग वाढवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हे ही वाचा : Akola : पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, पाहा Video
तर काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील अनेक भागात पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. आज हवामान विभागान रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भातील काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
दरम्यान, मुंबईत शुक्रवारी पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं, यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तसंच लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झाला होता. लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावत होत्या. पुण्यातही पावसाचा जोर वाढला असल्यानं खडकवासला धरणातून विसर्ग ३० हजार क्युसेक करण्यात आला. यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. यामुळे अद्याप पुराचा धोका नसला तरी गरज पडल्यास स्थलांतरासाठी महापालिकेच्या ३९ शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
हे ही वाचा : देशभरात ढिगभर पार्क असताना नामिबियन चित्ता ठेवण्यासाठी एमपीमधील कुनो नॅशनल पार्कचं का निवडलं? कारण आहे खास
ठाण्यात जोरदार पाऊस
भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीला पूर आला आहे. यामुळे नदीच्या किनारी असलेल्या 10 ते 12 घरांमध्ये पाणी शिरले आहे. याच पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नदीला जोडणाऱ्या खाडीच्या पाण्याची पातली वाढल्याने खाडी किनारी असलेल्या म्हाडा कॉलनी, इदगा, बंदर मोहल्ला सह परिसरातील अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे.