मुंबई 03 डिसेंबर : मुंबईला नवे विशेष पोलीस आयुक्त मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. एका उच्चपदावरील अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच देवेन भारती यांना सामावून घेण्यासाठी विशेष आयुक्त पद निर्माण केलं जात आहे. याबाबतचा आदेश लवकरच जारी केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. मात्र, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी टाइम्स ऑफ इंडियाने यांसदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला. पण त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात भारती हे शहरातील सर्वात शक्तिशाली आयपीएस अधिकारी होते. त्यानंतर ते लॉ अँड ऑर्डरचे सह आयुक्त झाले. त्यानंतर त्यांना अॅडिशनल डीजीपी म्हणून बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात हलवण्यात आलं होतं.
हे ही वाचा : ‘अण्णाजी पंत’ तारतम्य बाळगा आणि आधी…,शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना सुनावलं
2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. यावेळी IPS अधिकार्यांसाठी सर्वांत कमी दर्जाची असाइनमेंट मानल्या जाणार्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करणाऱ्या देवेन भारती यांना काढून टाकण्यात आलं होतं. देवेन भारती यांची 13 डिसेंबर 2022 रोजी ट्रॅफिक जॉइंट कमिशनर असताना बदली झाली होती.त्यांची जागा राजवर्धन यांनी घेतली होती.तेव्हापासून ते एटीस प्रमुख विनीत अग्रवाल, ठाणे येथील सीपी बिपिन कुमार सिंह आणि एसीबीचे अॅडिशनल डीजी प्रभात कुमार यांच्याबरोबर भारती हेही नवं पोस्टिंग मिळण्याची प्रतीक्षा करत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकार सत्तेत आल्यानंतर व देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी गृहखात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आले होते. एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, रश्मी शुक्ला यांना अँटिकरप्शन विभागामध्ये मुंबईच्या सीपी किंवा डीजी म्हणून परत आणण्याचा प्रस्ताव होता.कारण डिसेंबरमध्ये रजनीश सेठ यांची डीजीपी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पद रिक्त होतं.
हे ही वाचा : Sanjay Raut : संजय राऊतांनी जनतेतून निवडणूक लढवून दाखवावी, शिंदे गटाचं चॅलेंज
त्यानंतर विशेष सीपी म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव होता. परंतु, फोन-टॅपिंग प्रकरणामध्ये कथित भूमिकेबद्दल शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेला अर्ज न्यायदंडाधिकार्यांनी फेटाळला. यानंतर रश्मी यांना मुंबईत परत आणण्याच्या हालचाली सध्या थांबवण्यात आल्या आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही,त्यामुळे देवेन भारती यांना विशेष आयुक्तपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असं त्या आयपीएस अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.