जालना, 14 जून: मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) रविवारी 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी झाले. मुख्य म्हणजे 701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्ग अद्याप वाहनांसाठी खुला झाला नसताना येथ अपघाताची संख्या वाढताना दिसत आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. अनेक चालक या एक्स्प्रेसवेचा वापर करत आहेत. पण मात्र या मार्गावर सुरक्षा व्यवस्था नाही आहे. या अपघातात बळीराम खोकले (वय 45, रा. बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. खोकले यांच्यासोबत अन्य दोघेजण प्रवास करत होते. चंद्रकांत साबळे (45) आणि सुनील लिंबेकर (43) हे जखमींची नाव आहेत. Big News: ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून Hacked पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहराजवळ रविवारी संध्याकाळी5 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघात इतका भीषण होता की, ही अपघातग्रस्त कार एक्सप्रेस वेच्या मध्यभागी दुभाजक बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. अपघाताची धडक एवढी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आणि चालकाच्या शेजारी बसलेले खोकले हे गंभीर जखमी झाले. कारमधील अन्य दोन प्रवासी साबळे आणि लिंबेकर हेही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा चालक योगेश सांगळे (24) हा किरकोळ जखमी झाला आहे. या सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता खोकले यांना मृत घोषित करण्यात आले, तर दोन प्रवासी आणि चालक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. “पीडित बुलढाण्यातील मेहकर येथील रहिवासी आहेत. ही घटना घडली तेव्हा ते औरंगाबादहून आपल्या गावी परतत होते. सुरुवातीला मुसळधार पाऊस पडत असल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र तसं असलं तरी नंतर गाडीचा मागचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचे समोर आलं आहे. मृत हा हॉटेल व्यावसायिक असल्याचं सांगण्यात येत आहे. आम्ही मंगळवारी तीन जखमी लोकांचे जबाब नोंदवणार आहोत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. याप्रकरणी जालना येथील चंदनझिरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याचं सांगितलं. समृद्धी द्रुतगती मार्ग, जो मुंबई आणि नागपूर दरम्यानचे 701 किमी अंतर कापेल, हा देशातील सर्वात वेगवान द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) 55,000 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या एक्सप्रेसवेच्या बांधकामाचे काम करत आहे. Raj Thackeray यांच्या वाढदिवसाचा बॅनर फाडला, मुंब्र्यात तणाव प्रकल्पाचा पहिला टप्पा, नागपूर ते वाशिममधील शेलू बाजार दरम्यानचा 201 किमीचा पट्टा, या वर्षी 2 मे मध्ये लोकांसाठी खुला करण्यात येणार होता. दरम्यान नागपूरपासून 15 किमी अंतरावर असलेल्या वन्यजीव ओव्हरपास, ज्यावर वन्यप्राण्यांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी रस्त्यावर बांधकाम सुरू होते, त्याला तडे गेले आणि नुकसान झाले. एमएसआरडीसीने आता त्याच्या जागी पूर्णपणे नवीन संरचना उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे प्रकल्पाला विलंब झाला आहे. जानेवारी 2019 मध्ये सुरू झालेला, संपूर्ण प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. दरम्यान कोविड-19 महामारीमुळे आणि प्रकल्पाच्या काही भागांच्या कामाची गती यामुळे विलंब झाला. MSRDC आता एक्स्प्रेस वे जून 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने खुला करण्याची योजना आखली आहे.