JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai Goa Highway : मुंबई -गोवा महामार्गावर खड्डाचं पाणी उडल्याने तरूणाने त्याच पाण्यात शर्ट धूवत केला निषेध

Mumbai Goa Highway : मुंबई -गोवा महामार्गावर खड्डाचं पाणी उडल्याने तरूणाने त्याच पाण्यात शर्ट धूवत केला निषेध

रत्नागिरी जिल्ह्यात मागच्या कित्येक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून होणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. (Mumbai Goa Highway)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रत्नागिरी, 11 ऑगस्ट : रत्नागिरी जिल्ह्यात मागच्या कित्येक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून होणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. (Mumbai Goa Highway) मागच्या दोन वर्षांत झालेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य शहर असलेल्या चिपळून भागातील रस्ते पूर्णपणे खड्डेमय बनल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सनासुदीच्या काळात नागरिकांना याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. चिपळूनमध्ये एका प्रवाशाने वैतागून वेगळाच पराक्रम केला आहे.

रक्षाबंधनला बहिणीकडे जात असताना मुंबई -गोवा महामार्गावरील चिपळूणमध्ये प्रचंड खड्डे आहेत. यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात चिखलाचे पाणी साचले आहे. हे पाणी तरुणाच्या अंगावर पडल्याने चिखलाच्या पाण्याने त्याचे कपडे खराब झाले, यामुळे संतप्त तरुणाने महामार्गावरील खड्यातच आपला शर्ट अक्षरशः साबण लावून धुवून टाकला. त्याने तो शर्ट धुवत रस्ता बनवणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. त्या तरूणाने केलेल्या पराक्रमाची चांगलीच र्चा रंगली होती.

हे ही वाचा :  Maharashtra Rain : राज्यात आज येलो अलर्ट पण पुणे, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

संबंधित बातम्या

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील खड्यांमुळे बेजार झालेल्या वाहन चालकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांही अनेक अडचणींना सामोरे जावं लागतंय. आज रक्षाबंधनाच्या दिवशी या भावाने व्यक्त केलेला हा राग आपली व्यवस्था समजून घेईल का असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित होतोय. याचबरोबर मागच्या कित्येक वर्षापासून या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. मागच्या काही काळात या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास ही आणून देण्यात आले होते.

जाहिरात

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे थैमान

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून, जगबुडी नदी 7.5 मिटर इतकी धोक्याच्या पातळीवर वाहत असून नदीकिनारी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या हलक्या ते मुसळधार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खेड तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुवाँधार हजेरी लावली आहे. तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील नदी किनाऱ्यालगतचा बंदर मार्ग पाण्याखाली गेला आहे. नदी किनाऱ्यावरील शहरातील मटण मच्छीमार्केटला जगबुडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Kolhapur Rain Update : कोल्हापूरकरांचा धोका वाढला पाणी पातळीत वाढ, राधानगरी धरणाचा 1 स्वयंचलित दरवाजा उघडला

पावसाचा जोर कायम राहिल्यास खेड बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने बाजारपेठेतील व नदी किनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या चोवीस तासांत खेड मध्ये 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, दि. 8 रोजीपर्यंत 1790 मिलीमीटर एव्हडी नोंद झाली आहे. नारिंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी खेड - दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंग या ठिकाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावरून वाहतूक ठप्प झाली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या