JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / टँकरमधील गॅस गळतीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर अजूनही बंद; कधी सुरळित होणार वाहतूक?

टँकरमधील गॅस गळतीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर अजूनही बंद; कधी सुरळित होणार वाहतूक?

मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) अंजनारी पुलावरून काजळी नदीत कोसळलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्यामुळे आजही या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

जाहिरात

अपघातग्रस्त टँकर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 23 सप्टेंबर : मुंबई - गोवा महामार्गावर अंजनारी पुलावरून काजळी नदीत कोसळलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्यामुळे आजही या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. जोपर्यंत या टँकरमधील गॅस गळती थांबवली जात नाही किंवा या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट केला जात नाही, तोपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने या पुलावरची वाहतूक बंद राहणार असल्याचं वाहतूक संबंधित खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरमधून गॅस गळती, सुरक्षेसाठी वाहतूक वळवली, पाहा घटनास्थळावरचा VIDEO उरण जैन पी टीवरून गॅस तज्ज्ञांना पाचरण करण्यात आलं असून त्यांच्या सांगण्यानुसार या पुलावरून वाहतूक सुरु करण्यात येईल, असंही सूत्रांकडून समजत आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे, गोव्याला जाणारी वाहतूक ही सध्या पाली मार्गे दाभोळ भांबेडवरून लांजावरून गोवा अशी वळवण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक देवधे फाटा येथून हरचेरी काजरघाटी मार्गे मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली आहे. सदर पूल हा संपूर्ण रात्र वाहतुकीसाठी बंद होता. आजही तज्ज्ञांचा आवाहल येईपर्यंत हा पूल बंद राहणार आहे. फिल्मी स्टाईल राडा! भरधाव कारने हवेत उडवलं तरी तरुण करत राहिले फायटिंग; Watch Video मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन खाली नदीत कोसळला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरमध्ये गॅस होता. अपघातामुळे गॅस लिकीज होऊ लागला होता. त्यामुळे प्रशासनाने त्या पुलावरुन जाणारी वाहतूकच पर्यायी मार्गाला वळवली आहे. ही वाहतूक अद्याप सुरळित झालेली नाही. गोव्याच्या दिशेने जाणारा एमएच 12 एलटी 6488 कंटेनर मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील पुलाचा कठडा तोडून थेट काजळी नदी जाऊन कोसळला. या भीषण अपघातामध्ये चालकचा बुडून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या