मुंबई, 01 फेब्रुवारी : जानेवारीच्या सुरूवातीपासून मुंबईत हवा प्रदुषीत झाल्याचे दिसून येत होते. मागच्या 3 आठवड्यांपासून मुंबईत हवेच्या प्रदुषणात वाढ झाल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मुंबईतील हवा प्रदूषणाची पातळी सर्वाधिक मागच्या महिन्यात जानेवारीत प्रदूषित’ ते ‘अतिप्रदूषित’ हवा असल्याची नोंद झाली आहे. दिल्ली, पुणे शहराच्या तुलनेत मुंबईतील हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे दिल्लीनंतर आता मुंबई आणि पुणे हवा प्रदुषणात या शहरांचाही समावेश झाला आहे.
मुंबईला लाभलेल्या किनारपट्टीमुळे समुद्री वाऱ्यांमुळे मुंबईतील हवा खेळती होती. मात्र, हवा प्रदूषणाची पातळी वाढल्याने आणि समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्याने धुळीचे कण अथवा प्रदुषणाचे कण एकाच ठिकाणी साचून राहत आहेत.
हे ही वाचा : हिवाळ्यात आवर्जून खा हा रानमेवा! आरोग्याला होतात चमत्कारिक फायदे
तसेच, वाहतूक कोंडीमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधील पेट्रोल, डिझेलचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने, हवेत अनेक विषारी वायूचे प्रमाण वाढले आहे. बांधकामामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम मुंबईतील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
परिणामी, मानवी आरोग्याला धोका पोहचत आहे. ‘सफर’ या संकेतस्थळावरून भांडुपमधील हवा सामान्य ते प्रदूषित या श्रेणीत नोंदली जायची. परंतु मागच्या काही दिवसांपासून भांडुपमधील हवा अतिप्रदूषित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यासह वांद्रे-कुर्ला, चेंबूर, नवी मुंबई येथील हवादेखील अतिप्रदूषित स्थितीत गेली आहे. दरम्यान मुंबईतील महत्वाच्या ठिकाणीही हवेची गुणवत्ता कमी झाली आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
मुंबई दिल्लीला मागे टाकणार
मुंबईत मागच्या चार दिवसांपासून हवेची गुणवत्ता खराब होत आहे. मागच्या चार दिवसांत सर्वात खराब हवा 324 अशी नोंदवण्यात आली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत 336 अशी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली आणि मुंबईत काही आकड्यांचा फरक राहिला आहे. यामुळे भविष्या मुंबई दिल्लीला मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा : महाराष्ट्रात थंडीची लाट, मुंबई, पुण्यासह, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात अलर्ट जारी
जानेवारी महिन्यात शहराचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘खूप खराब’ राहण्याची ही दुसरी वेळ आहे. SAFAR या संस्थेच्या अंदाजानुसार हवेची गुणवत्ता आणखी दोन दिवस खराब राहण्याची शक्यता आहे, जानेवारी हा हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत गेल्या पाच वर्षांतील सर्वात वाईट ठरण्याची शक्यता आहे.