JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी: खासदार संभाजीराजे छत्रपती नवा पक्ष स्थापन करणार?

मोठी बातमी: खासदार संभाजीराजे छत्रपती नवा पक्ष स्थापन करणार?

Maratha reservation: मराठा आरक्षणाप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि संभाजी राजे यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 मे: खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje) नवा पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे खासदार पदाचा राजीनामा देण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सध्या संभाजीराजे हे वर्षा निवासस्थानावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि संभाजी राजे यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. संभाजीराजे हे नवीन पक्ष किंवा संघटना स्थापन करून, मराठा आरक्षण लढा तीव्र करू शकतात. तसंच मराठा सोडून बहुजन समाजाला एकत्र आणून मराठा आरक्षण लढा नव्याने सुरू करण्याचीही शक्यता आहे. यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू करण्यात आलं आहे. राजकीय पक्षांशी फारकत घेऊन कोरोना संपल्यावर लढा अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे हे भाजपला रामराम करून शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन पुन्हा खासदार पद मिळवू शकतात. हेही वाचा-  क्रूरतेचा कळस! पुण्यात विकृताने धारदार शस्त्राने मुक्या जीवाचे फोडले डोळे दरम्यान दुपारी 5 वाजता संभाजी राजे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. संभाजीराजे उद्या प्रकाश आंबडेकर यांचीही भेट घेणार आहेत. हेही वाचा-  एकच नंबर!  देवेंद्र फडणवींसाचा ‘हा’ निर्णय ऐकून तुम्हालाही होईल आनंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजी राजे यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. वर्षा शासकीय निवासस्थान येथे सुरू असलेल्या बैठकीला अशोक चव्हाण यांच्यासह राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोनी देखील बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी संभाजीराजेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या