मुंबई, 18 नोव्हेंबर : राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केल्याने भाजपकडून त्यांच्यावर चांगलाच टीकेचा भडीमार होत आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर यांच्यासह अन्य नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या दरम्यान राज्यसभेचे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
बोंडे माध्यमांशी बोलत होते, यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधीना 20 दिवसांची काळ्यापाण्याची शिक्षा झाली तर राहुल गांधीची पिवळी झाल्याशिवाय राहणार नाही. अशी खरमरीत टीका भाजप खासदार अनिल बोंडें यांची टीका. 2017 मध्ये लोकसभेत राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल बोलले तेव्हा उद्धव ठाकरेच म्हणाले होते राहुल गांधी जर दिसले तर त्यांना जोड्याने हाणेल. मात्र आता त्याचाच मुलगा आदित्य ठाकरे राहूल गांधींच्या हातात हात घेऊन यात्रेला जात आहे. अशा भाषेत त्यांनी टीका केली.
भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल वक्तव्य केल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे भाजप नेते राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.भारत मातेची सेवा करणाऱ्या व आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीर सावरकर बद्दल राहुल गांधी असे बोलत तर कुठेतरी गडबड आहे राहुल गांधी यांचा डी एन ए चेक करने आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली
हे ही वाचा : ‘महाविकास आघाडीत फूट पडू शकते’; संजय राऊतांचं मोठं विधान, या कारणामुळे नाराज
राहुल गांधी काय म्हणाले होते
याआधी राहुल गांधींनीही नुकतंच सावरकरांबाबत मोठं विधान केलं होतं. ‘सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. एकीकडे देशासाठी अवघ्या 24 व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत.
सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली’, असं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
हे ही वाचा : सावरकरांचे नातू करणार मोठा गौप्यस्फोट; पत्रकार परिषद घेत राहुल गांधींना देणार सडेतोड उत्तर
फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर -
देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील असे एक नेते आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला. आजही काँग्रेसकडून त्यांचा विचार कारावासात टाकायचं काम सुरु आहे. त्यांना राज्यातील जनताच उत्तर देईल. त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘स’ माहिती नाही. ते किती वर्षे तुरुंगात होते ते ही त्यांना माहिती नाही," असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.