JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आईने 6 मुलांना दिले विहिरीत फेकून, पाण्यात तडफडून सर्वांचा दुर्दैवी मृत्यू, महाड हादरलं

आईने 6 मुलांना दिले विहिरीत फेकून, पाण्यात तडफडून सर्वांचा दुर्दैवी मृत्यू, महाड हादरलं

आज संध्याकाळी रागाच्या भरात ही महिला मुलांना घेऊन विहिरीकडे पोहोचली. तिने आधी सहा मुलांना विहिरीत फेकून दिले.

जाहिरात

आज संध्याकाळी रागाच्या भरात ही महिला मुलांना घेऊन विहिरीकडे पोहोचली. तिने आधी सहा मुलांना विहिरीत फेकून दिले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 30 मे : रायगड (raigad) जिल्ह्यातील महाड (mahad) तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेनं आपल्या सहा मुलांना विहिरीत (Mother throws 6 children into a well ) फेकून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 6 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाड तालक्यातील ढालकाटी गावात ही घटना घडली आहे. रुना चिखुरी साहनी असं या महिलेचं नाव आहे. एका महिलेनं आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकून दिले होते. यात एक मुलगी आणि सहा मुलं होती. हे कुटुंब उत्तर प्रदेशमधील राहणारे आहे. या कुटुंबाला एक मुलगा आणि पाच मुली होत्या. पती हा दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो दारूच्या नशेत पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. या त्रासाला पत्नी कंटाळून गेली होती. ढालकाटी गावातील एका शेतात विहीर आहे. आज संध्याकाळी रागाच्या भरात ही महिला मुलांना घेऊन विहिरीकडे पोहोचली. तिने आधी सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. त्यानंतर स्वत: विहिरीत उडी मारली. पण, त्याचवेळी तिथून एक आदिवासी जात होता. त्याने तिला पाहिले आणि विहिरीतून बाहेर काढले. तिने जास्त प्रमाणात पाणी प्यायले होते. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती आता स्थिर आहे. ( आर्यन खान प्रकरणात हिरोगिरी भोवले, समीर वानखेडेंची अखेर महाराष्ट्राबाहेर बदली ) पण, या दुर्दैवी घटनेमध्ये सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रोशनी साहनी (वय 10 वर्षे), करिष्मा  साहनी (वय 08 वर्षे), रेश्मा साहनी (वय 06 वर्षे), विद्या साहनी (वय05 वर्षे), शिवराज साहनी (वय 03 वर्षे) आणि दीड वर्षांच्या राधा साहनी या मुलीचा समावेश आहे.   पतीच्या त्रासाला कंटाळून या महिलेनं हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या