JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / झोपेत असणाऱ्या मुलीची आईनेच केली हत्या; डोक्यात दगड घालून काढला काटा, धक्कादायक कारण उघड

झोपेत असणाऱ्या मुलीची आईनेच केली हत्या; डोक्यात दगड घालून काढला काटा, धक्कादायक कारण उघड

Murder in Mangalwedha: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा याठिकाणी एका आईनं आपल्या पोटच्या मुलीची डोक्यात दगड घालून हत्या (Mother Killed daughter) केली आहे. हत्येचं धक्कादायक कारण उघड झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मंगळवेढा, 11 जून: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा  याठिकाणी एका आईनं आपल्या पोटच्या मुलीची डोक्यात दगड घालून हत्या (Mother Killed daughter) केली आहे. मुलगी रात्री घराच्या गच्चीवर झोपलेली असतानाचं आईनं तिचा काटा काढला आहे. यानंतर आरोपी आईनं स्वतः पोलिसांत जाऊन अज्ञात व्यक्तीनं आपल्या मुलीची हत्या केल्याची माहिती दिली आहे. याप्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून आरोपी आईला अटक केली आहे. हत्येचं धक्कादायक कारणंही समोर आलं आहे. संबंधित हत्या झालेल्या 35 वर्षीय मुलीचं नाव मंगल कुबेर नरळे आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपी आईचं नाव चंदाबाई कुबेर नरळे (वय-55)  असून दोघीही मंगळवेढ्यातील अकोला रस्ता याठिकाणी वास्तव्याला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही काळापासून मृत मंगलचं आणि तिच्या आईचं जमीन आणि पैशाच्या वादातून नेहमी भांडणं होतं होती. याच रागातून आई चंदाबाई यांनी मुलगी मंगलची हत्या केली आहे. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास चंदाबाई आणि मंगल या मायलेकी घराच्या गच्चीवर झोपायला गेल्या होत्या. दरम्यान मुलगी मंगलला झोप लागली. यावेळी आपली मुलगी झोपल्याचं पाहून आईनं मुलीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. मुलीची हत्या केल्यानंतर आईने पहाटे तीनच्या सुमारास पोलीस स्थानकात जाऊन आपल्या मुलीची अज्ञात व्यक्तीनं हत्या केल्याची फिर्याद दिली. हे ही वाचा- आजारी वडिलांचं झालं ओझं; उरुळी कांचनमध्ये मद्यपी मुलानं ब्लेडनं चिरला गळा या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहाणी केली. यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी फिर्यादी आईची चौकशी केली. पोलीस चौकशीत आरोपी आईनं हत्येचा रचलेला बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसी खाक्या दाखवताचं आरोपी आईनं हत्येची कबुली दिली आहे. जमीन आणि पैशाच्या वादातून हत्या केल्याचं आईनं पोलीस चौकशीत सांगितलं आहे. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा अधिक तपास मंगळवेढा पोलिसांकडून केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या