JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Monsson Rain Weather Update : खुशखबर! मान्सूनचा परतीचा प्रवास संपला, हवामान खात्याची घोषणा

Monsson Rain Weather Update : खुशखबर! मान्सूनचा परतीचा प्रवास संपला, हवामान खात्याची घोषणा

परतीच्या पावसानेही राज्यातील विविध भागात पाऊस सुरू होता. मान्सूनचा परतीचा प्रवास थांबणार अशी माहिती हवामान खात्याने दिली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑक्टोबर : जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातून मोसमी पाऊस परतणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मागच्या चार महिन्यांपासून राज्यात मान्सूनने धुमाकूळ घातले होते. दरम्यान परतीच्या पावसानेही राज्यातील विविध भागात पाऊस सुरू होता. मान्सूनचा परतीचा प्रवास थांबणार अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. कालपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. दरम्यान राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.

संपूर्ण राज्यातून ओलावा कमी होणे म्हणजेच आपल्या राज्यातून 2022 च्या मान्सूनच्या समाप्तीचे प्रतीक देम्यात आले आहेत. अशी घोषणा रविवारी हवामान विभागाने केली त्यामुळे मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यात (दि.28) ऑक्टोबर पर्यंत सर्वत्र कोरडे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :  भारतच नाही तर या देशांमध्येही निसर्गाचा तांडव! फोटो पाहून उडेल झोप

संबंधित बातम्या

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला थायलंड ने असे (सितरंग) नाव दिले असून रविवारी सकाळीच त्याने वेग घेतला. सोमवारी याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याने भारतीय किनारपट्ट्याना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई, पुणे शहरासह महाराष्ट्रातुन मान्सून परतीला गेल्याची अधिकृत घोषणा रविवारी हवामान विभागाने केली. त्यामुळे येथून पुढे पाऊस पडलाच तर अवकाळी स्वरूपाचा असेल.

जाहिरात

बंगालच्या उपसागरात पूर्वमध्य भागात 22 रोजी शनिवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. शनिवारी रात्री त्याचा वेग ताशी 60 ते 70 किमी इतका झाला व रविवारी 22 रोजी सकाळीच त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. सोमवारी 23 रोजी त्याचा वेग तशी 110 किमी राहील त्यामुळे भारतीय किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा :  परतीचा पाऊस फक्त नुकसानच करत नाही तर त्याचे फायदे देखील आहेत, जाणून घ्या शेतीतज्ज्ञांकडून…

जाहिरात

महाराष्ट्राला धोका नाही..

हवामान विभागाने जाहीर केल्या प्रमाणे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिमाण होणार नाही.चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातच राहणार ते भारतीय किनार पट्ट्यात धडकणार नाही असा अंदाज आहे.मात्र या भागात जोरदार पाऊस पडेल.प्रामुख्याने ओडिशा व पश्चिम बंगाल च्या किनार पट्टीवर या चक्रीवादळाचा प्रभाव पडू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या