प्रशांत लिला रामदास (नवी दिल्ली), 12 जानेवारी : मोदी सरकारमधून महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यातील मंत्रीमंडळाचा लागण्यापूर्वी केंद्रातील मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 जानेवारी पूर्वी होणार केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 16 आणि 17 जानेवारी रोजी भाजप कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक होणार आहे यामध्ये फेरबदलाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान राज्यातील सत्ता पालट झाल्यानंतर ठाकरे गटातील 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्याने केंद्रातही शिंदे गटातील खासदारांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मोदी, शाह यांच्याकडून कुणाचा पत्ता कट ? कुणाला नवी संधी याची जोरदार चर्चा दिल्ली दरबारी रंगली आहे. तर महाराष्ट्रातील शिंदे गटाला दोन मंत्री पद दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान शिंदे गटातील कोणत्या खासदारांनी दिल्लीत संधी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा : तब्बल 12 तासांनी मुश्रीफांची चौकशी थांबली, ईडीच्या तपासात काय समोर आलं?
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक 16 व 17 जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत 2023 मध्ये निवडणुका असलेल्या राज्यांसंदर्भातील रणनिती तयार केली जाणार आहे. त्याचवेळी लोकसभेची 2024 ची निवडणूक लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हा विस्तार कार्यकारणीच्या बैठकीनंतर व संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी होणार आहे. संसदेचे अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मदत करणाऱ्या शिंदे गटाच्या काही चेहऱ्यांना केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार याकडेही राज्यातील जनतेसह राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा : बाळासाहेबांच्या तैलचित्रावर ठाकरेंची शिवसेना नाराज, शिंदेंचा पलटवार, वाद पेटणार!
धक्कातंत्राची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला नारळ देणार व कोणाला मंत्री करणार, याची खबरबात कोणालाच नाही. परंतु २०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन काही वरिष्ठ मंत्र्यांना सरकारमधून पक्षात पाठवले जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. तथापि, हे मंत्री कोण असतील, हे विस्तारा दरम्यान धक्कातंत्राच्या माध्यमातूनच समजणार आहे.