राज ठाकरेंचा दोन दिवसांनी म्हणजे 14 जून रोजी वाढदिवस आहे आणि याच आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 18 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या या अयोध्या दौऱ्यासाठी मनसे (MNS) कार्यकर्ते देखील उत्सूक आहेत. या अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्याना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून या ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे सेनेकडून या ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची हस्ती मानले जातात. भलेही राज ठाकरेंकडे सत्ता नसली किंवा निवडणुकीत पुरेसं यश मिळालं नसलं तरी राज्याच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळेच अयोध्या दौऱ्यानंतर मनसे-भाजपातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यादरम्यान विशेष सुरक्षा केंद्र सरकार देणार असल्याची चर्चा आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्यावेळी PFIचे सदस्य गोंधळ घालू शकतात. त्यामुळेच राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देण्य़ासाठी हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय. ( सदावर्ते मुंबई, सातारा पाठोपाठ आता अकोल्याची जेलची हवा खाणार? ) राज ठाकरे 5 जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या आधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे अयोध्येला जाणार तेव्हा उत्तर प्रदेश सरकारकडूनही त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येला मोठा फौजफाटा तैनात राहणार असल्याची शक्यता आहे. मनसे-भाजप एकत्र येणार? राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती धरला आहे. तसेच भाजपदेखील हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुनच देशभरात पसरलेला पक्ष आहे. या दोन्ही पक्षांची हिंदुत्ववाद्याच्या मुद्द्यावरुन एकजुट होते का? ते येणारा काळ ठरवेल. पण त्याआधी घडणाऱ्या घटना या त्यासाठी सकारात्मक असल्याच्या दिशेला आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटी झाल्या होत्या. याशिवाय मध्यंतरी भाजप नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटी हे येत्या काळात नवं राजकीय समीकरण तर घेऊन येणार नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतोय. कारण एकामागेएक अशा घटना अगदी तशाच साजेशा घडताना दिसत आहेत.