JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मनसेचे आमदार म्हणाले, क्वारंटाईन लोक बाहेर फिरताना दिसल्यास जेलमध्ये टाका

मनसेचे आमदार म्हणाले, क्वारंटाईन लोक बाहेर फिरताना दिसल्यास जेलमध्ये टाका

क्वारंटाईन लोकं बाहेर फिरताना दिसले, तर त्यांना सरळ जेलमध्ये टाका, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कल्याण, 27 मार्च: क्वारंटाईन लोकं बाहेर फिरताना दिसले, तर त्यांना सरळ जेलमध्ये टाका, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. डोंबिवलीत कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आमदार पाटील यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान, डोंबिवलीत दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून हे दोघेही परदेशातून आलेले होते. मात्र परदेशातून आल्यानंतर 14 दिवस घरी न बसता ते बाहेर फिरले. एक जण तर मोठ्या लग्नसोहळ्यालाही गेला होता. त्यामुळे कोरोना समाजात मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. यानंतर परदेशातून आलेले असे क्वारंटाईन लोक बाहेर फिरताना दिसले तर त्यांना सरळ जेलमध्ये टाका, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. हेही वाचा… हिंदुजा हॉस्पिटलचा आजूबाजूचा 5 किमी परिसर सील, डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू महाराष्ट्राची #Italyहोऊ द्यायची नसेल तर… दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 153 झाली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, महाराष्ट्राची #Italyहोऊ द्यायची नसेल तर ‘सरकारी कर्फ्यू’ जाहीर करावा, अशी मागणी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी गेल्या आठवड्यात केली होती. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गरज पडल्यास सरकारी कर्फ्यु जाहीर करावा, असं ट्वीट करुन आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे सरकारला आवाहन केलं होतं. हेही वाचा.. अरे देवा…नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोना, एकाच घरातला चौथा रुग्ण काय म्हणाले राजू पाटील? ‘महाराष्ट्राची #Italy होऊ द्यायची नसेल, आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’ चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा.’

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या