JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवतीर्थावर"टोमणे मेळावा"साठी..., मनसे नेत्याची वादात उडी, शिवसेनेला डिवचले

शिवतीर्थावर"टोमणे मेळावा"साठी..., मनसे नेत्याची वादात उडी, शिवसेनेला डिवचले

खंजीर,मर्द,मावळा,वाघनखं,गद्दार,निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये,

जाहिरात

खंजीर,मर्द,मावळा,वाघनखं,गद्दार,निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये,

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये दसरा मेळावा घेण्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आता या वादात मनसेनंही उडी घेतली.  ‘शिवतीर्थावर"टोमणे मेळावा"साठी परवानगी देवून टाकावी आणि खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये’ असा खोचक टोला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला. शिवसेनेवर एकदाही टीकेची संधी न सोडणारे मनसेचे प्रवस्ते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा दसरा मेळाव्याच्या वादावरून शिवसेनेला डिवचले आहे.

‘मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर"टोमणे मेळावा"साठी परवानगी देवून टाकावी आणि खंजीर,मर्द,मावळा,वाघनखं,गद्दार,निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये, अशी आग्रहाची विनंती करत गजानन काळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. तसंच, यावेळची स्क्रिप्ट नेहमीप्रमाणे बारामतीवरूनच येणार आहे. तमाम महाराष्ट्राला एक प्रश्न पडला आहे की, हिंदुत्वाला तिलांजली वाहिल्यानंतर शिल्लक सेनेच्या टोमणे मेळाव्याला अबू आझमी आणि ओवेसी स्टेजवर असणार आहेत का? असा सवालही काळेंनी उपस्थितीत केला. तसंच, अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनी या प्रश्नाचं उत्तर जरूर महाराष्ट्राला द्यावं असा सवालही गजानन काळे यांनी केला आहे. (शिवाजी पार्क मैदान कोणाच्या…नाही’; दसरा मेळाव्यावरुन गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला) दरम्यान, मध्यंतरी,मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्याचं आवाहन केलं होतं. “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण. हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी मार्गाला मार्गदर्शन करावे,”, असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या