JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MLC Election UPDATES : हितेंद्र ठाकूर ठरणार ट्रम्प कार्ड, मतदानापुर्वी वाढवलं सर्वांचं टेन्शन

MLC Election UPDATES : हितेंद्र ठाकूर ठरणार ट्रम्प कार्ड, मतदानापुर्वी वाढवलं सर्वांचं टेन्शन

विधानपरिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मतं महत्त्वाची ठरणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : बहुजन विकास आघाडीचे (BVA) अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) हे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी विरारहून रवाना झाले आहेत. ठाकूर निवासस्थान सोडले यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांसह एकटेच होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आमचे मतदान हे गुप्त असल्याचे सांगून घोडेबाजारावर भाष्य केले. कोणी घोडेबाजार केला याची चौकशी करावी म्हणजे पुढच्या वेळी महालक्ष्मीच्या रेसकोर्स मध्ये घोडे बाजार होईल असे त्यांनी जाहीर केले. क्षितीज ठाकूर मुंबईत विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांचे मतं मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी सर्वच उमेदवारांनी मनधरणी केली आहे. अशातच  बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मतं महत्त्वाची ठरणार आहे. पण विधान परिषद निवडणुकीला बहुजन विकास आघाडीचे एक मत कमी पडणार असल्याची शक्यता होती. पण, ऐन शेवटच्या क्षणी ही शक्यता आता दूर झाली आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे तिन्ही आमदार मतदान करणार आहे. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप, राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर, भाजपचे उमेदवार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकुरांची विरार मध्ये येऊन भेट घेतली होती. तसंच निवडणुकीला काही तास उरले असताना शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर कुणाला मतदान करणार हे महत्त्वाचे आहे. मुंबईला रवाना होण्यापूर्वी ठाकूर यांनी कुणाला मतदान करणार याचं उत्तर न दिल्यानं सर्वच उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. MLC Election UPDATES : नवा ट्विस्ट! मलिक-देशमुखांची मतदानासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला एकूण 27आमदारांच्या मतांची आवश्यकता असते. भाजपाकडे मित्रपक्षांसह मिळून एकूण ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार भाजपाच्या ४ जागा अगदी सहज निवडून येतील. राष्ट्रवादीकडे ५४ आमदार, शिवसेनेकडे ५६ आमदार आणि काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल, तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला भाजपाशी लढत द्यावी लागेल. दरम्यान, या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षातील नेत्यांकडून विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. भाजपाच्या तर ५ जागा रिक्त होत असून ४ जागाच निवडून येत आहे. पण, भाजपने पाचवी जागा सुद्धा लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या