उस्मानाबाद 28 फेब्रुवारी : जिल्ह्यात द्राक्षाच्या बागा तोडणारी टोळी सक्रिय झाल्याने बागायतदार शेतकरी हदरून गेले आहेत. या टोळीने आता पर्यंत 5 ते 6 शेतकऱ्यांच्या लाखोंच्या द्राक्ष बागा उदवस्त केल्या आहेत ही टोळी रात्रीच शेतात जाऊन अवघ्या काही मिनिटात उभ्या असणाऱ्या द्राक्षाच्या बागा जमीनदोस्त करत आहेत गेली अनेक दिवसांपासून या घटना घडत आहेत. मात्र पोलिसांना देखील याचा माग लागेना त्यामुळे द्राक्ष बागायत दार पुरते धास्तावले आहेत. द्राक्षाची बाग माळरानावर पिकवली जाते त्यामुळे दुष्काळ ग्रस्त उस्मानाबाद जिल्यातील शेतकरी हळूहळू द्राक्षबागे च्या शेतीकडे वळू लागला आहे. गारपीट व अवकाळी वावटळीचा द्राक्ष बागांना धोका असतो. पण आता नवच संकट उभं राहिलंय. आता आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे. या द्राक्ष बागायतदारच्या शेतात जाऊन अज्ञात टोळी द्राक्ष बागच्या तारा कट करणे किंवा झाडं कटरच्या साह्याने कापणे व ती बाग उद्धवस्त करतात. ही टोळी कुठलीही चोरी करत नाही. मात्र बागेचे अवघ्या काही मिनीटात होत्याचे नव्हते करते. भूम तालुक्यातील सोनेगाव शिवारातल्या सुमन खैरे यांची 2 एकरची बाग या टोळीने जमीनदोस्त केलीय.
त्यांनी 600 झाडाची तार कापून बाग जमीनदोस्त केली आहे. तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेली बाग उदवस्त झालेली पाहून सुमन बाई यांच्या डोळ्यांना धारा लागल्या आहेत. ही टोळी गेली अनेक दिवसांपासून जिल्यात सक्रिय आहे सुरवातीला तुळजापूरमधील बागा तोडल्या आता ही टोळी भूम तालुक्यात हैदोस घालत असून ते कोण आहेत कशामुळे हे सगळं करत आहेत हे ना पोलिसांना माहीत आहे ना शेतकऱ्यांना.
पोलिसही यावर बोलायचे टाळत आहेत तर या टोळीने शेतकरी कुटुंब पूर्ण हतबल झाले आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यातील शेती ही उदवस्त झाली आहे अश्यातच या टोळीच्या हैदोसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी पुरता खचला आहे. या टोळ्यांच्या कृत्याला वेळीच आवर घालावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.