JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राखी बांधून घेणारा भाऊच ठरला नराधम, लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना

राखी बांधून घेणारा भाऊच ठरला नराधम, लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी जालना, 16 मे : राज्यात बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाचा व्हायरस फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असतानाही अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासत आपल्या 12 वर्षीय सख्या चुलत बहिणीवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जालना शहरातील दर्गावेश परिसरात ही घटना घडली आहे. सदर बाजार पोलिसांनी आरोपी नराधमाला तात्काळ बेड्या ठोकत तुरुंगात टाकलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील दर्गावेश परिसरात राहणाऱ्या अमोल ढवळे या 20 वर्षीय नराधमानं आपल्याच 12 वर्षीय सख्ख्या चुलत बहिणीवर तिच्याच खोलीत जाऊन लैंगिक अत्याचार केला. माऊथ वॉशमुळे मरू शकतो कोरोना विषाणू? काय आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं खरंतर, भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो. पण आपल्या अल्पवयीन बहिणीवर अशा प्रकारे अत्याचार केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ही घटना घडलेल्यानंतर पीडित तरुणीने प्रकरणाची माहिती आईला सांगितली. त्यांनतर आईने तात्काळ पोलिसांत धाव घेत घटनेची माहिती दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवलं असून तिची आरोग्य चाचणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एक चहाची तलफ आणि वाचलं 24 जणांचं आयुष्य, काही लोकांचा प्रवास ठरला अखेरचा संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या