JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अत्यावश्यक सेवेचं नाव, गाडीत होता 1 कोटींचा गुटखा, पोलिसांच्या सापळ्यात असा अडकला

अत्यावश्यक सेवेचं नाव, गाडीत होता 1 कोटींचा गुटखा, पोलिसांच्या सापळ्यात असा अडकला

औरंगाबाद शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून दररोज गुटखा येत असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद 15 मे: औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी तब्बल 1कोटी रुपयांचा गुटखा पकडल्यानंतर खळबळ उडालीय. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली  ट्रकमधून औरंगाबाद शहरात येत असलेला गुटखा झालटा फाटा येथे पकडण्यात आलाय. याप्रकरणी 2 जणांना स्थानिक  गुन्हे शाखेने सापळा रचून अटक करण्यात आली असून एक कोटी  रुपयांच्या मुद्देमाल जप्त केलाय. लॉकडाऊन असताना दोन महिन्यापासून औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मुक्तपणे गुटखा विक्री सुरू आहे. घरपोच सुविधा सुरू असल्यानं गुटख्याचा हा धंदा मागील आठवड्यात सीसीटीव्हीच्य माध्यमातून समोर आला. औरंगाबाद शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून दररोज गुटखा येत असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आलीय. एक ट्रकमध्ये भाजा आणि फळांचे ट्रे ठेवून ही वाहतूक सुरू होती. हा ट्रक पकडल्यानंतर गुटखा कसा शहरात येतोय, हे समोर आलंय. कर्नाटकमधून  सोलापूर-अहमदनगर मार्गे बीडबायपास रोडने एक टाटा ट्रकमध्ये गुटखा घेऊन येत असल्याची माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने बीडबायपास रोडवरील झालंटा फाटा येथे  सापळा रचून पकडले.  यावेळी सय्यद अकील सय्यद अयुब आणि शेख रफिक  शेख कदिर यांचा ताब्यातील बंदी असलेला 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. हे वाचा - जन्मदात्यानंच आवळला 6 वर्षांच्या मुलीचा गळा, नंतर समोर आलं धक्कादायक कारण… धोका वाढला! जालन्यात कोरोनाचा संसर्ग पसरला, डॉक्टर तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या