JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेनेसोबत आता मराठा ताकद, संभाजी ब्रिगेडपाठोपाठ आणखी एका संघटनेचा पाठिंबा

शिवसेनेसोबत आता मराठा ताकद, संभाजी ब्रिगेडपाठोपाठ आणखी एका संघटनेचा पाठिंबा

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युतीनंतर आता संभाजी ब्रिगेडची मातृ संस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने देखील

जाहिरात

उद्धव ठाकरे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद, 01 सप्टेंबर : शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी झाल्यानंतर नव्याने मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच संभाजी ब्रिगेडने (sambhaji brigade) सेनेसोबत युती केली आहे. आता संभाजी ब्रिगेड पाठोपाठ शिवसेनेला मराठा सेवा संघाचा देखील पाठिंबा मिळाला आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युतीनंतर आता संभाजी ब्रिगेडची मातृ संस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने देखील या युतीला पाठिंबा दिला आहे. राज्यात शिवसेना व संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार असल्याचे सांगत मराठा सेवा सांगता मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पुढील काळात मराठा सेवा संघाची जबाबदारी 40 वर्षाच्या आतील व शासकीय सेवेमध्ये उच्च पदस्थ असणाऱ्या मराठा अधिकाऱ्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. केवळ 30 टक्केच जुने जाणते पदाधिकारी मराठा सेवा संघाच्या पदावर कार्यरत असणार आहेत. (नारायण राणेंनी केली आदित्य ठाकरेंची उंदराशी तुलना, गणेशोत्सवात होणार ‘शिमगा’?) मराठा सेवा संघाचे राज्यभर एक कोटी सभासद तर 36 वेगवेगळे कक्ष आहेत. या सर्व कक्षात फेरबदल करण्यात येणार असून मराठा सेवा संघातचा यापुढे चेहरा तरुण असणार आहे. या फेरबदलासाठी राज्यभर मराठा सेवा संघाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या फेरबदलाच्या माध्यमातून पुढील काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीला मदत करून राजकीय सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मराठा सेवा संघाचा प्रयत्न असणार आहे. (उद्धव ठाकरेंच्या खास माणसाच्या घरी पोहोचले भाजपचे नेते आशिष शेलार, राजकीय चर्चांना उधाण) आज मराठा सेवा संघाचा 32 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तने मराठा सेवा संघ आपला नवीन चेहरा घेऊन येत असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे संस्थपक कार्यदयक्ष अर्जुन तनपुरे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या