JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुन्हा एल्गार! मराठा संघटना आक्रमक, तीन पायाची खुर्ची जाळून केला सरकारचा निषेध

पुन्हा एल्गार! मराठा संघटना आक्रमक, तीन पायाची खुर्ची जाळून केला सरकारचा निषेध

मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटना आक्रमक

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 9 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. यावरून विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा आरक्षण स्थगित होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलं जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका घेतली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हेही वाचा… असं अधिवेशन घ्यायचं असेल तर ‘मातोश्री’च्या गच्चीवर घ्या,नारायण राणेंची जहरी टीका बीडमध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्याचे पडसाद उमटले आहेत. मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचा तीन पायाची खुर्ची जाळून तीव्र निषेध केला. त्याचबरोबर राज्यभर पुन्हा एल्गार करण्यात येईल, असा इशारा देखील मराठा कार्यकर्त्यानी केला आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रासाठी ‘काळा दिवस! सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारव घणाघाती टीका केली आहे. राज्याच्या इतिहासात मराठा समाजाच्या दृष्टीनं आणि संपूर्ण राज्याच्या दृष्टीनं आजचा ‘काळा दिवस’ असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या सरकारनं टिकणारे आरक्षण दिलं होतं. मुंबई हायकोर्टानं आमची बाजू मान्य केली होती. मुंबई हायकोर्टानं मान्यतेची मोहोर उठवली होती. मात्र, ‘महाभकास’ आघाडीला हे आरक्षण टिकवता आलं नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी घणाघाती टीका केली. तात्पुरती स्थगिती हा शब्द योग्य नाही आहे. खंडपीठाचा निकाल लागेपर्यंत आता आरक्षण नाही. आता याबद्दल आंदोलन करुनही उपयोग नाही आहे. आम्ही याविषयी आग्रह धरत होतो, पण आम्ही तयारी केलीये असं फक्त ट्वीट करून अशोक चव्हाण हे फक्त सांगत होते. सरकारनं स्वत: हून घटनात्मक खंडपीठाकडे जावं असा अर्ज केला नाही, इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण नको होतं, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. हेही वाचा.. ‘जलयुक्त’ नव्हे तर ‘झोलयुक्त’ शिवार! ‘मी लाभार्थी’खर्च भाजपकडून वसूल करा ना उद्धव ठाकरे, ना शरद पवार यांनी याच लक्ष दिलं नाही. मात्र, भाजप स्वस्थ बसणार नाही. हे करंटे लोकं आहेत, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या