पुणे, 29 एप्रिल : पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Maharashtra weather forecast) आगामी तीन दिवसांत राज्यातल्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या बहुतांश भागात हलक्या (light rain forecast in Maharashtra) सवरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही भागांमध्ये मध्यम आणि जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (वाचा- कोरोना लस घेणाऱ्याला मिळणार 7500 रुपये; लसीकरणासाठी इथं खास ऑफर ) पुणे वेधशाळेच्या अहवालानुसार गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक स्वरुपाचा पाऊस पडला आहे. मात्र उतर भागात तापमानात वाढ झाली असून कमाल मर्यादेपर्यंत तापमान पोहोचत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता आगामी तीन दिवसांसाठीही राज्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रामुख्यानं 30 एप्रिल, 1 मे आणि 2 मे रोजी पावसाचा अंदाज असून त्यानंतर हे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. (वाचा- Covaxin सुद्धा झाली स्वस्त; Bharat Biotech ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत ) पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्श अशा सर्वच विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यताही वर्तवली आहे. यामध्ये प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. तसंच काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यतादेखिल वेधशाळेनं वर्तवली आहे.
पुणे विभागात प्रामुख्यानं बहुतांश भागात दुपारनंतर वातावरण ढगाळ राहू शकतं. तापमानाचा विचार करता मराठवाडा आणि विदर्भामध्ये तापमान 40 अंशाच्या पुढं सरकलं आहे. कोकण गोव्याच्या भागामध्येदेखिल तापमानात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. विदर्भात तर उन्हाचा पार जास्तच वाढलेला पाहायला मिळत आहे.