JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 10वीच्या निकालाआधी राहा टेन्शन फ्री, त्यासाठी 'या' गोष्टी कराच

10वीच्या निकालाआधी राहा टेन्शन फ्री, त्यासाठी 'या' गोष्टी कराच

रिझल्टआधी विद्यार्थी आणि पालक खूप टेंशन घेतात. टेंशन येऊ नये म्हणून या काही टिप्स -

जाहिरात

PTI6_8_2015_000185B

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जून : सगळीकडे सध्या चर्चा आहे ती 10वीच्या निकालाची. येत्या काही दिवसात 10वीचा रिझल्ट लागेल. SSC RESULT 2019 या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. रिझल्टआधी विद्यार्थी आणि पालक खूप टेन्शन घेतात. टेन्शन येऊ नये म्हणून या काही टिप्स - 1. थोड्या वेळ एकटे आणि शांत राहा - रिझल्टच्या आधी अनेक लोकांशी उगाचंच चर्चा करून टेन्शन वाढतं. म्हणून थोडा वेळ तरी एकदम शांत बसा. मनातले नकारात्मक विचार बाजूला सारा. एकटाच फेरफटका मारून या. 2. परीक्षेत लिहिलेले पेपर्स आठवत बसू नका - अनेकदा विद्यार्थी परीक्षेनंतर आपल्या उत्तरांबद्दल मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करतात. खरं तर तसं करू नयेच. पण आता निकालाआधी त्याबद्दल पुन्हा चर्चा नको. परीक्षा देऊन बराच अवधी लोटलाय, हे विसरू नका. 3. चांगल्या मित्र-मैत्रिणींना भेटा - तुमचा मूड हसरा ठेवतील अशा मित्रमैत्रिणींना भेटा. ज्यांना भेटून तुमचा तणाव हलका होतो, त्यांच्या बरोबर जरुर वेळ घालवा. 4. स्वत:बद्दल नकारात्मक विचार करू नका - आपल्याला हेच जमत नाही, तेच जमत नाही असा विचार करत बसू नका. स्वत:बद्दलची नकारात्मक भावना तणाव जास्त वाढवते. आपण केलेल्या चांगल्या गोष्टी, मिळालेलं यश आठवत राहा. 5. आवडती गाणी ऐका - रिझल्टच्या आदल्या दिवशी आवडती गाणी ऐका. एखादा हलकाफुलका सिनेमा पाहा. त्यानं तणाव कमी होतो. 6. स्वत:लाच एखादी भेटवस्तू जा - बाजारात जाऊन स्वत:साठी छोटीशी खरेदी करा. त्यानं मनाला नक्कीच आनंद मिळेल. 7. चहा-काॅफी जास्त पिऊ नका - रिझल्टच्या आदल्या दिवशी चहा-काॅफी प्यायल्यानं तणाव जास्त वाढतो. तसं करू नका. उलट आवडते पदार्थ खा. 8. योग आणि व्यायाम करा - योग आणि व्यायामानं मनावरचा तणाव हलका होतो. त्यामुळे रिझल्टच्या आदल्या दिवशी मेडिटेशन करा. साधे साधे व्यायाम म्हणजे धावणं, दोरीच्या उड्या करा. 9. पालकांनी विशेष काळजी घ्यावी - मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांसाठीही काही गोष्टी सांगितल्यात. रिझल्टच्या दिवशी पालकांनी घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवावं. पुन्हा पुन्हा रिझल्ट या विषयावर बोलू नये. महत्त्वाचं म्हणजे निकाल काही लागला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, हा दिलासा पाल्याला द्यावा. 10. करियरचे अनेक मार्ग - अनेकदा कमी मार्क मिळाले तर अ‍ॅडमिशन कशी मिळणार हे टेन्शन असतं. पण हल्ली करियरची क्षेत्र वाढलीयत. संधीही भरपूर उपलब्ध आहेत. मार्कांप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात अ‍ॅडमिशन घेता येईल, हे पालक आणि मुलांनीही लक्षात ठेवावं. लवकरच SSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवरून जाहीर होईल. शिवाय ‘News18 Lokmat’च्या वेबसाइटवरही बोर्डाच्या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे पाहता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या