JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Rains Update: राज्यात पावसाची संततधार सुरुच, पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट; अनेक नद्यांना पूर

Maharashtra Rains Update: राज्यात पावसाची संततधार सुरुच, पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट; अनेक नद्यांना पूर

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै : जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने (Maharashtra Rains Update) जुलै महिन्यात दमदार आगमन केलं. राज्यातीव विविध भागात जोरदार पाऊस बसत आहे तर काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. प्रचंड पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर (Flood) आला आहे. गावं, वस्त्या पाण्याखाली गेल्या आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची संततधार सुरुच आहे. पाच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट (Red Alert in five District) जारी केला आहे. यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. Gadchiroli Rain Update : गडचिरोलीत पुराचा हाहाकार, अनेकांच्या घरात पाणी, एकजण वाहून गेला तर गावांचा संपर्क तुटला

कोल्हापुरात नद्यांच्या पातळीत वाढ

मागच्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने नद्या इशारा पातळीच्या बाहेर गेल्या आहेत. पंचगंगा नदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने नद्यांजवळील गावांना जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून स्थलांतराचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी 31 फुटांवर पंचगंगा नदीची पातळी होती झालेल्या पावसाने तब्बल 4 फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे लवकरच पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Monsoon Tips: पावसाळ्यात ट्रॅफिकच्या किचाटातून मिळू शकते सुटका, फक्त करा ‘हे’ छोटं काम

पावसामुळे 11 जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात एक दु्र्दैवी घटना घडली. स्कॉर्पिओ गाडी पाणी वाहत असूनही चालकाने पुलावर घातल्याने मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेले. तर, नाशिक जिल्ह्यात एका सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच जण तर नंदुरबार जिल्ह्यात दोन महिला वाहून गेल्या. मुंबई उपनगरात दोन तर गडचिरोलीत प्रत्येकी एक बळी गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या