JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'आता घरी राहून कोरोनाचे बारा वाजवूया', महाराष्ट्र पोलिसांचं अनोखं आवाहन

'आता घरी राहून कोरोनाचे बारा वाजवूया', महाराष्ट्र पोलिसांचं अनोखं आवाहन

महाराष्ट्र पोलिसांनी ‘नटरंग’ चित्रपटातील गाणं ‘वाजले की बारा’चा वापर करत त्यांनी हे ट्वीट केले आहे. ‘आता घरी राहून बारा वाजवूया- कोरोनाव्हायरस चे!’ असं ट्वीट महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या संक्रमण रोखण्यासाठी देशभरात जनजागृती पसरवण्यात येत आहे. या लढाईत पोलीस,डॉक्टर, नर्स, सफाई कामगार अतोनात मेहनत घेत आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वजण झटत आहेत. अशावेळी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की कोरोनाच्या लढाईत आपण या सर्व ‘कोरोना कमांडों’ची साथ दिली पाहिजे. आणि ही मदत तुम्ही घरी थांबूनच करू शकता. तरच कोरोनाचं संक्रमण थांबेल आणि देश कोरोनामुक्त होईल. हा संदेश देण्यासाठी पोलिसांकडून विविध क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडून सोशल मीडियावर वारंवार संदेश देण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून नुकतच करण्यात आलेले ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे वाचा- अमिताभ यांनी शेअर केला झगमगणाऱ्या भारताचा नकाशा, लोकांनी म्हटलं FAKE ) महाराष्ट्र पोलिसांनी ‘नटरंग’ चित्रपटातील गाणं ‘वाजले की बारा’चा वापर करत त्यांनी हे ट्वीट केले आहे. ‘आता घरी राहून बारा वाजवूया- कोरोनाव्हायरस चे!’ असं ट्वीट महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे. नटरंगचा दिग्दर्शक रवि जाधव याच्यासह अनेकांनी हे ट्वीट रिट्वीट देखील केले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अमृता खानविलकरचा फोटो ट्वीट केला आहे आणि त्यावर ‘मला राहु द्या वा घरी’ असं देखील म्हटलं आहे.

दरम्यान नागपूर पोलीसही यामध्ये मागे नाही आहेत. नागपूर पोलिसांनी हटके अंदाजात Social Distancing चा सल्ला दिला आहे. नागपूर पोलिसांनी एक ट्वीट केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि शाहरूख खान (Shahrukh Khan) यांची मुख्य भूमिका असणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना सुद्धा त्यांनी चित्रपटातील डायलॉगचाच वापर केला आहे. यामध्ये नागपूर पोलिसांनी लिहिलं आहे की- ‘Don’t underestimate the power of Social Distancing!’ पोलिसांनी शाहरुखच्या डायलॉगचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला दिला आहे.

भारतामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3666 आहे आणि कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 291. म्हणजेच काही नियमांचं पालन केल्यास कोरोनाला हरवणं शक्य आहे. याच सर्व बाबी पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या