नाशिक, 03 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसने (Coronavirus) पुन्हा शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रालाही (Maharashtra) कोरोनाचा धोका आहे. नवी दिल्ली (New delhi), तेलंगणा (Telangana) , राजस्थान (Rajasthan) पाठोपाठ आता महाराष्ट्रातही कोरोनाव्हायरसचा संशयित रुग्ण सापडला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये (Nashik) हा संशयित रुग्ण आढळून आला. नाशिकमध्ये एका व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत. त्याला विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. आता तिथल्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. **संबंधित -** कोरोनामुळे जगभरातील अब्जाधीशांचं कोट्यवधींचं नुकसान, सर्वसामान्यांनाही बसणार झळ चीनहून (China) भारतात परतलेले कोरोनाव्हायरसचे पहिले 3 रुग्ण नुकतेच बरे झाले, भारत सुटकेचा निश्वास टाकतो न टाकतो तोच आता महाभयंकर असा कोरोनाव्हायरस (COVID-19) भारतात पुन्हा आला आहे. सोमवारी नवी दिल्ली आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर जयपूरमध्येही एका व्यक्तीचा कोरोनाव्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शिवाय नवी दिल्लीतील रुग्णाला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान होण्यापूर्वी त्याने उत्तर प्रदेशातील नोएडात (Noida) आपल्या मुलाच्या बर्थ डे पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामुळे शाळेतील मुलं आपल्या पालकांसह आली होती. त्यामुळे आता खबरदारी म्हणून या मुलांना आणि पालकांना वेगळं ठेवण्यात आलं आहे. कोरोनाच्या भीतीनं नोएडातील 2 खासगी शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित - मोबाईलमध्येही घुसला कोरोना; ‘या’ मेसेजवर क्लिक कराल तर व्हाल व्हायरसचे शिकार दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. कोरोनाव्हायरस भारतात पसरू नये यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे मात्र नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घ्या. सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी ही सर्व लक्षणं कोरोनाव्हायरसची आहेत. त्यामुळे सामान्य म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. शिवाय कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक असे उपाय करा. हात स्वच्छ धुवा, शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका, शिवाय प्राण्यांपासून दूरच राहा.