JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Uddhav Thackeray : त्या 19 बंगल्यांची चौकशी सुरू, हिवाळी अधिवेशनात नागपूर तापणार; सरकार ठाकरेंना घेरणार!

Uddhav Thackeray : त्या 19 बंगल्यांची चौकशी सुरू, हिवाळी अधिवेशनात नागपूर तापणार; सरकार ठाकरेंना घेरणार!

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे कुटुंबाच्या नावे रायगड जिल्ह्यातल्या कोर्लेईत असलेल्या कथित बंगल्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 डिसेंबर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे कुटुंबाच्या नावे रायगड जिल्ह्यातल्या कोर्लेईत असलेल्या कथित बंगल्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत किरीट सोमय्या या प्रकरणी याचा पाठपुरावा करत होते. पण आता या प्रकरणात ग्रामविकास खात्याची एंट्री झालीय. ग्रामविकास खात्यानं कोर्लेईतल्या बंगल्यांची चौकशी सुरु केलीय. दोन दिवस या प्रकरणाचा चौकशी अहवालही मागवलाय. आणि मुख्य म्हणजे अवघ्या चार दिवसांवर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे, त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी या बंगल्यांचा मुद्दा उपस्थित करुन विधिमंडळ अधिवेशन गाजवण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या परिवाराचे रायगडमध्ये 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. या प्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी 48 तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात

काय आहेत आरोप? मुरुडच्या कोलई गावातील 19 बंगले ठाकरे कुटुंबाकडून अन्वय नाईकांकडून खरेदी केले. या बंगल्यांचा 2014 ते 2019 पर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्सही भरला. 2021 मध्ये सर्व रेकॉर्ड्स गायब केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या