JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Corona : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उद्या सकाळी नऊ वाजता भवितव्य ठरणार

Maharashtra Corona : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उद्या सकाळी नऊ वाजता भवितव्य ठरणार

मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ झालेली बघायला मिळतेय. त्यामुळे राज्यात किंवा मुंबई-पुणे या ठराविक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू होणार की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 4 जानेवारी : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड विस्फोट होताना दिसतोय. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ झालेली बघायला मिळतेय. त्यामुळे राज्यात किंवा मुंबई-पुणे या ठराविक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू होणार की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. याच प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवरांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात कोरोनाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्या सकाळी नऊ वाजता अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. जे निर्णय इथे घेण्यासारखे होते ते मी जाहीर करतोय. जे निर्णय राज्य सरकारने मुंबईत बसून घेतले पाहिजे त्यासाठी उद्या सकाळी नऊ वाजता बैठक आहे. त्या बैठकीत आम्ही त्याबाबत ठरवू. नंतर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ, मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतली. त्यानंतर तो निर्णय सगळीकडे जाहीर करु”, असं अजित पवार यांनी सांगितलं. पुण्यात कडक निर्बंध, मास्कशिवाय फिरण्यास आणि थुंकण्यास मनाई पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे पुण्यात उद्यापासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच कुणी मास्क नसताना थुंकताना दिसलं तर त्या व्यक्तीकडून थेट 100 रुपयांचा दंड घेतला जाईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं. हेही वाचा :  दंड, No Entry, शाळा बंद, पुण्यात उद्यापासून नवे निर्बंध ‘शासकीय कार्यालयात दोन्ही लस घेतली असेल तरच परवानगी’ “मुंबई आणि पुण्यावर कोरोना संकट मोठ्या प्रमाणात आलं आहे. त्यामुळे पुण्यात आता उद्यापासून मास्क असेल तर 500 रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकलात तर 1000 रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दोन्ही लस ज्याने घेतली नसेल तर कोणतीही हॉटेल, शासनाचे कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. एवढ्या दिवसांपासून आम्ही आवाहन करुनही काही लोकं राहिलेली आहे. कारण जे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यापैकी 36 जणांनी लसच घेतली नसल्याचं समोर आलं आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या