JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जानकरांना भाजप हायकंमाडकडून हिरवा कंदिल, सूत्रांची माहिती

जानकरांना भाजप हायकंमाडकडून हिरवा कंदिल, सूत्रांची माहिती

महादेव जानकरांना भाजप हायकंमाडकडून हिरवा कंदिल मिळालाय. जानकरांच्या रासप तिकिटावर भाजपाध्यक्ष अमित शहांची मंजुरी मिळालीय, असं सूत्रांकडून कळलंय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 06 जुलै : महादेव जानकरांना भाजप हायकंमाडकडून हिरवा कंदिल मिळालाय. जानकरांच्या रासप तिकिटावर भाजपाध्यक्ष अमित शहांची मंजुरी मिळालीय, असं सूत्रांकडून कळलंय. महादेव जानकर यांचा भाजपच्या तिकीटावर असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. मात्र जानकरांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या तिकिटावर संभ्रम होता, तो आता संपलाय.भाजप तिकिटावर विधानपरिषदेवर जायला जानकरांनी स्पष्ट नकार दिलाय. भाजपचा राजीनामा न देता अर्ज भरल्यास रासपचा अर्ज बाद होऊ नये म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला आहे. आणि भाजपाध्यक्ष अमित शहांनी जानकरांच्या तिकिटाला मंजुरी दिलीय. हेही वाचा उन्नावमध्ये एका महिलेला जंगलात नेऊन बलात्काराचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल ‘तू माझी आयडॉल आहेस मनिषा…’ सोनालीने व्यक्त केली भावना

संत्रापुरी कशी बनली तुंबापुरी, हे पहा फोटो

विधान परिषदेसाठी भाजपचे पाच सदस्य निवडून येतात. यासाठी भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांची यादी आली. यात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना भाजपचे उमेदवार दाखवले होते. भाजपच्या चार जणांनी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले; परंतु महादेव जानकर यांनी भाजपकडून अर्ज दाखल करण्यास नकार दिला व राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या