विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 19 जानेवारी : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत (Kudal nagar panchayat election result) शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला आहे. अशा प्रकारे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकूण 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने या निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. कुडाळ नगरपंचायत निवडणूक निकाल एकूण जागा - 17 शिवसेना - 7 जागांवर विजयी काँग्रेस - 2 जागांवर विजयी भाजप - 8 जागांवर विजयी कुडाळ नगरपंचायत प्रभाग क्र. 4 बाजारपेठ (सर्वसाधारण महीला) 1) रेखा काणेकर (भाजप) 2) श्रुती वर्दम (शिवसेना) विजयी 3) सोनल सावंत (काँग्रेस) 4) मृण्मयी धुरी (अपक्ष) प्रभाग क्रमांक 5 कुडाळेश्वर वाडी (सर्वसाधारण) 1) अभिषेक गावडे (भाजप) (विजयी) 2) प्रवीण राऊळ (शिवसेना) 3) सुनील बांदेकर (अपक्ष) 4) रमाकांत नाईक (मनसे) 5) रोहन काणेकर (काँग्रेस) प्रभाग क्र. 6 गांधीचौक (सर्वसाधारण महीला) 1 प्राजक्ता बांदेकर (भाजप) (विजयी) 2) देविका बांदेकर (शिवसेना) 3) शुभांगी काळसेकर (काँग्रेस) 4) आदिती सावंत (अपक्ष ) प्रभाग क्र. 7 डॉ. आंबेडकर नगर (सर्वसाधारण) 1) विलास कुडाळकर (भाजप) (विजयी) 2) भूषण कुडाळकर (शिवसेना) 3) मयूर शारबिद्रे (काँग्रेस प्रभाग क्र. 8 मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महीला) 1) मानसीसावंत (राष्ट्रवादी काँग्रेस) (विजयी) 2) रेवती राणे (भाजप) 3) आफरीन करोल (काँग्रेस) कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज विजय भाजपला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी ज्या मतदारसंघात सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लावली होती त्या जागेवर भाजपचा पुन्हा पराभव झाल्याचं दृश्य आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं पुन्हा एकदा निर्विवाद असं वर्चस्व राहिलं आहे. कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकणू 17 जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवर विजय झाला आहे. तसेच एक जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीने एकूण 12 जागांवरील विजय खिशात घातला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे या नगरपंचयातीत काँग्रेसलाही 3 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे कर्जतच्या नगरपंचायत निवडणुकीच महाविकास आघाडीचा तब्बल 15 जागांवर विजय झाला आहे.