सांगली, 23 जुलै: मागील 48 तासांत सांगलीसह कोकणात पावसानं (Rain in Sangli) हाहाकार उडवला आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी अतिवृष्टी (Heavy rainfall) झाले आहे. त्यामुळे परिसरातील जवळपास सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी आभाळ फाटल्यानं पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अशात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सांगलीतून (Sangli) वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ (Water level rise in Krishna river) झाली आहे. त्यामुळे याठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कृष्णा नदीतील पाण्याची पातळी वाढल्यानं परिसरात धोका वाढत आहे. अशात काही सांगलीकर मात्र या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी (Swimming in krishna river) उतरले आहेत. उंच पुलावरून उड्या मारत नागरीक पोहण्याचा आनंद लुटत आहेत. हा नजारा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक देखील गर्दी करत आहेत. खरंतर, कृष्णा नदीत पोहण्यासाठी रोज सकाळी परिसरातील लोकं त्याठिकाणी येत असतात. पण नदीला पूर आल्यावर किंवा पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर पोहणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. हेही वाचा- LIVE: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली संबंधित पोहणारी लोकं उंच पुलावरून उड्या मारून नदीच्या प्रवाह बरोबर लांबपर्यंत वाहत जात आहेत. नदीच्या प्रवाहासोबत हरिपूर वेशीपर्यंत वाहत जाऊन तेथून परत माघारी फिरत आहेत. संबंधित नागरिकांना पोहताना पाहण्यासाठी परिसरातील नागरिक पुलावर आणि नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यामध्ये अगदी लहान मुलांपासून महिलाही पोहणाऱ्या लोकांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
हेही वाचा- महाडमधील पूरस्थिती गंभीर; 10 हजारहून अधिक नागरिक पुराच्या विळख्यात खरंतर, महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे सांगलीत देखील संततधार सुरूच आहे. शिवाय कृष्णा नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. सध्या आयर्विन पुलावर पाण्याची पातळी 38 फुटांच्यावर गेली आहे. कृष्णा नदीची 40 फुटांवर इशारा पातळी तर 45 फुटांवर धोक्याची पातळी आहे.