JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bornhan 2023 : बाळाला बोरन्हाण का घातलं जातं हे माहिती आहे का? पाहा Video

Bornhan 2023 : बाळाला बोरन्हाण का घातलं जातं हे माहिती आहे का? पाहा Video

What is Bornahan : मकर संक्रात ते रथसप्तमी या कालावधीमध्ये लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे. हे बोरन्हाण कसं घातलं जातं? त्याची परंपरा काय आहे ? हे माहिती आहे का?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 26 जानेवारी : आपल्या लहान बाळाला बोरन्हाण किंवा करअंघोळ घालण्याची पारंपारिक पद्धत महाराष्ट्रात आजही जपली जाते. आजकाल सोशल मीडियावर आपल्या लहानग्याचे बोरन्हाण केल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर केले जातात.  या परंपरेचं नेमके महत्त्व आजही बऱ्याच जणांना माहीत नाही. ही पद्धत पुढे जपली जण्यासाठी हे बोरन्हाण करण्यामागचं महत्व, ते कधी आणि कसं करायचं, हे माहीत करून घेणे गरजेचे आहे.  कोल्हापूरच्या राजनंदिनी ऐतवडेकर या गृहिणीने देखील त्यांच्या बाळाचे नुकतेच बोरन्हाण घातले. त्यांनी बोरन्हाणाची पद्धत आणि त्यामगील कारण याबद्दल माहिती दिली आहे. का घातले जाते बोरन्हाण? अविरा या एक वयाच्या मुलीच्या बोरन्हाण कार्यक्रमाच्या निमित्ताने राजनंदिनी यांनी सर्व माहिती गोळा केली होती. बोरन्हाण हा बाळासाठी केलेला एक छोटा कार्यक्रम असतो. बाळाला आनंद वाटावा, त्याला नव्या माणसांची ओळख व्हावी आणि बोरन्हाणाच्या निमित्तानं वेगवेगळे पदार्थ खायला मिळावेत, ही अपेक्षा असते असं राजनंदिनी यांनी सांगितलं. बोरन्हाण हा एक शिशुसंस्कार सोहळा असतो. बाळांना उत्तम आरोग्य मिळावं म्हणून ते केले जाते.  लहान मुलांच्या शरीराला आवश्यक उर्जा मिळवण्यासाठी बोरं, भुईमुगाच्या शेंगा आणि उसाचे पेर यासारख्या उपलब्ध गोष्टी यामध्ये वापरतात. त्याच बरोबर लाह्या, चुरमुरे, हिरवे वाटणे, हरभरे, गाजराचे तुकडे यासोबत लहान मुलांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोळ्या, चॉकलेट आणि बिस्कीटांचाही वापर सध्या या कार्यक्रमात केला जातो. 26 जानेवारीला कोल्हापूरकर जिलेबी का खातात? पाहा नादखुळ्या परंपरेचा Video लहान मुलं इतरवेळी ही फळे दिली तर खात नाहीत. पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली, तर ती नक्की उचलून खातात. त्यामुळे त्यांचे शरीर पुढील वातावरणासाठी सदृढ बनू शकते, अशी माहिती राजनंदिनी यांच्या सासू सुषमा ऐतवडेकर यांनी दिली. कधी घालावं बोरन्हाण ? मकर संक्रांतीपासून पुढे रथसप्तमीपर्यंतच्या काळात बोरन्हाण घातले जाते. तान्ह्या बाळापासून साधारणतः पाच वर्ष वयाच्या बाळापर्यंत प्रत्येकाचे बोरन्हाण केले जाते.  यावेळी लहान मुलांना छान काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. बाजारात लहान मुलींसाठी काळा फ्रॉक आणि मुलांसाठी काळा कुर्ता मिळतो. त्यावर तिळगुळ वापरून बनवलेले हलव्याचे दागिने घातले जातात.

कसं घालतात बोरन्हाण ? घरी मस्त डेकोरेशन करून दारात छान रांगोळी काढली जाते. लहान मुलाला अथवा मुलीला पाटावर बसवले जाते. त्यानंतर आप्तेष्टांकडून लहान मुलाला ओवाळले जाते. हा लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे इतर लहान मुलांनाही बोलावले जाते. बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि चिरमुरे असे एकत्र करुन बाळाच्या डोक्यावरुन ओतावे. लहान मुले बोरे, गोड-गोड उसाचे पेर, तिळाची बोरे उचलून खातात किंवा घरी घेऊन जातात. शिवाय घरी आलेल्या सुवासिनींना हळदीकुंकू लावले जाते आणि त्यांना तिळगूळ देखील वाटला जातो. माणसांपेक्षाही धूमधडाक्यात श्वानांचं लग्न; नवी मुंबईतील अनोख्या लग्नाचा VIDEO या सोहळ्यानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येतात आणि यानिमित्ताने गप्पा-गोष्टी रंगतात. हा समारंभ घरगुती असतो परंतु घरी गजबज असल्याने तो अतिशय उत्साही आणि आनंद देणारा असतो. त्यामुळे अशा परंपरा जपल्या जाण्याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या