JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलीची आत्महत्या; रस्त्यावरच आढळली बेशुद्धावस्थेत अन् शेजारी सिरींज

प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलीची आत्महत्या; रस्त्यावरच आढळली बेशुद्धावस्थेत अन् शेजारी सिरींज

शनिवारी रात्री मित्रांसोबत पार्टी करून ती घरी परतली होती. मात्र पहाटे घरी कोणाला न सांगता ती बाहेर निघून गेली होती. तीदेखील डॉक्टरच होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 10 जुलै : कोरोनाच्या देशात अनेक ठिकाणी आत्महत्येच्या घटना समोर आल्या. अगदी श्रीमंतापासून ते गरीबांपर्यंत नागरिक मानसिक आजारांचा सामना करीत आहे. अशावेळी आत्महत्या हा पर्याय नसून यावर योग्य ते उपचार घेणं आवश्यक आहे. मात्र तरीही दैनंदिन आयुष्यात सामना करावा लागणार तणाव सहन न झाल्याने अनेक तरुण-तरुणी आत्महत्येसारखं भयंकर पाऊल उचलतात. कोल्हापूरातूनही (Kolhapur News) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीने भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. लोकांचा जीव वाचवणाऱ्या एका डॉक्टर तरुणीच्या (Doctor women) आत्महत्येच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. अपूर्वा हेंद्र असे तिचं नाव असून ती प्रसिद्ध डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे याची कन्या आहे. आज सकाळी ताराबाई पार्क येथील डी मार्टच्या समोर ती बेशुध्द अवस्थेत सापडली होती. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचे निधन झाले. शनिवारी रात्री मित्रांसोबत पार्टी करून ती घरी परतली होती. पहाटेच्या सुमारस ती घरातून कोणाला न सांगता बाहेर पडली. सकाळी अपूर्वा दिसत नसल्याने वडिलांनी शाहूपुरी पोलिसांत धाव घेतली. त्याच वेळी पोलिसांना मिळालेल्या वर्दीवरून पोलीस वडिलांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अपूर्वा बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेली आढळून आली. तर तिच्या शेजारी विरेनियम इंजेक्शनची बाटली आणि सिरींज आढळून आली. त्यामुळे या इंजेक्शनची अधिक मात्र घेऊन तिने जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आत्महत्येचं भयंकर पाऊल उचलण्यामागील नेमकं काय कारणं आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या