JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूरकरांना भरली हूडहूडी; स्वेटरने सजली बाजारपेठ, Video

कोल्हापूरकरांना भरली हूडहूडी; स्वेटरने सजली बाजारपेठ, Video

गेले काही दिवस कोल्हापूरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे उबदार कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली असून कोल्हापुरातील बाजारपेठ स्वेटरने सजली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 29 ऑक्टोबर : गेले काही दिवस कोल्हापूरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे उबदार कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली असून कोल्हापुरातील बाजारपेठ स्वेटरने सजली आहे. दसरा चौकातील स्वेटर विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी उसळली आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या थंडीच्या कालावधीत शहरात उबदार कपडे मिळतात. दसरा चौकातील स्टॉलवर शहराच्या कानाकोपऱ्यांपासून ते ग्रामीण भागातूनही ग्राहक खरेदीसाठी येतात. यावर्षी दसरा चौकात जवळपास 25 ते 30 स्वेटर विक्रेत्यांनी आपले स्टॉल या ठिकाणी लावले आहेत. हे विक्रेते हिमाचल प्रदेश, तिबेट आणि कर्नाटक येथील आहेत. बाहेरच्या प्रांतातून येऊन ते कर्नाटक राज्यात स्थायिक झालेले आहेत. तेथून ते कोल्हापुरात हा व्यवसाय करण्यासाठी दरवर्षी येत असतात. तर त्यांच्याकडे असणारा माल हा ते पंजाब राज्यातून मागवतात. हेही वाचा :  Kolhapur : आता बाळ रडणारचं नाही, डॉक्टरांनी तयार केला स्मार्ट पाळणा Video काय काय असते विक्रीला ? जन्मलेल्या बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना लागणारी सर्व प्रकारची स्वेटर्स, हातमोजे, कानटोप्या इथे मिळतात. साधे स्वेटर, फरचे जॅकेट, स्पोर्ट्स जॅकेट, महिलांचे स्वेटर्स त्याचबरोबर उच्च दर्जाची फुल जॅकेटही इथे मिळतात. किती रुपये आहे किंमत? स्वेटर आणि जॅकेटचे विविध 15 प्रकार इथे पहायला मिळतात. नुकत्याच जन्मलेल्या बाळांचे स्वेटर 200/- रू. पासून 1000/- रू. पर्यंत, वयस्कर लोकांसाठी स्वेटर 350/- रू. पासून 1200/- रू. पर्यंत, जॅकेट 800/- रू. पासून 1500/- रू. पर्यंत, फरचे जॅकेट 1200/- पासून 2000/- पर्यंत, साधे स्वेटर 360/- रू. पासून 600/- पर्यंत, लेडीज स्वेटर 400/- रू. पासून 1000/- रू. पर्यंत, स्पोर्ट्स जॅकेट 850/- रू. पासून 1500/- पर्यंत, कानटोपी 100/- पासून 200/- रू. पर्यंत, हातमोजे 70/- रू. पासून 150/- पर्यंत या ठिकाणी स्टॉलवर उपलब्ध आहेत. हे सर्व दर स्वेटरच्या प्रकारानुसार थोडेफार कमी केले जातात. हेही वाचा :  Kolhapur: ऑनलाईनच्या जमान्यात दिवाळीला दुकानातूनचं खरेदीला पसंती, VIDEO तिबेट मधून रिफ्यूजी म्हणून भारतात आल्यानंतर भारत सरकारने आम्हाला कर्नाटकमध्ये राहायला जागा दिली. त्यामुळे आम्ही तिथे स्थायिक झालो. पण आमचे बरेचसे बांधव तिकडचे आहेत. दरवर्षी आम्ही या ठिकाणी स्वेटर विकायला येत असतो. कोल्हापूरचे लोक देखील आम्हाला चांगला प्रतिसाद देतात. इथून आमची चांगली रोजीरोटी चालते तिबेटीयन स्वेटर विक्रेता सांगतात. कोल्हापुरात दसरा चौकात दरवर्षी हे स्वेटर विक्रेते येत असतात. यांच्याकडे चांगल्या प्रतीचे स्वेटर मिळतात आणि त्यांची किंमत देखील परवडणारी आहे. त्यामुळे आम्ही इथे खरेदी करायला आलो आहोत, असं ग्राहकांनी सांगितले. स्टॉल पत्ता  महानगरपालिका गाळे, दसरा चौक, स्टेशन रोड कोल्हापूर - 416002

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या