कोल्हापूर, 15 नोव्हेंबर : बलात्काराच्या समर्थानात मोर्चा काढणारी भाजपा, ताई बाजूला सरा म्हणणाऱ्यांवर केस टाकते आहे. हातरसच्या पीडितेचा रात्रीच्या अंत्यसंस्कार करणारे हिंदुत्व सांगतात, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल - पोलिसांनी त्यावेळी अंत्यसंस्कार केले, हे डिपार्टमेंट पोलिसांनी कधी उघडले. सोलापूरचा भाजपचा जिल्हाध्यक्षचा व्हिडिओ बाहेर येतो. पण त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. राहुल शेवाळे यांचे अनेक व्हिडिओ पीडिता शेअर करते. मात्र, त्यांच्यावर काही होत नाही. देवेंद्र भाऊ काय चालले हे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. महिलांना बोलल्यावर देवेंद्र फडणवीस यांना छान वाटते असे झाले आहे. मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार सगळे महिलांवर बोलत आहेत. बलात्काऱ्यांना भाजप पेढे भरवतात. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. महिलांकडे बघण्याचा यांच्या दृष्टिकोन गलिच्छ तुच्छ आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. हेही वाचा - विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठा निर्णय - शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षचिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला होता. आता याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेत धनुष्यबाणाचं चिन्हच गोठवलं. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने न्यायालयात धाव घेत हा निर्णयच रद्द करण्याविषयी याचिका केली होती. पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.